Full Width(True/False)

WhatsAppचे लय भारी फीचर्स, ७ दिवसांनंतर आपोआप गायब होणार मेसेज

नवी दिल्लीः खूप दिवसांपासून '' फीचरवर काम करीत आहे. लवकरच या फीचरला रोलआउट करण्याची शक्यता आहे. च्या दाव्यानुसार, फेसबुकची मालकी असलेल्या आपल्या युजर्ससाठी लवकरच या फीचरला रिलीज करणार आहे. रिलीज आधी एका सूत्राने माहितीनुसार, डिसअपिरिंग मेसेजेस फीचर संबंधी माहिती उघड केली आहे. वाचाः 'Disappearing Messages' ला कस्टमाइज करण्याचा पर्याय युजर्संना मिळणार नाही. या फीचरला एकदा इनेबल केल्यानंतर सर्व नवीन मेसेज ७ दिवसांनंतर डिलीट होतील. म्हणजेच युजर्स आपल्याला हवे असलेल्या मेसेजला गायब करण्यासाठी टाईम सेट करू शकणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार जर चॅटला ७ दिवसांपर्यंत आपण उघडले नाही तर मेसेज गायब होतील. परंतु जर तुम्ही नोटिफिकेशन पॅनेलला क्लियर केले नाहीत तर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज चेक करु शकाल. वाचाः रिपोर्टमध्ये म्हटले की, ज्यावेळी तुम्ही कोणत्याही मेसेजचे उत्तर देता. त्यावेळी पहिला मेसेज कोट राहतो. जर तुम्ही डिसअपिरिंग मेसेजचे उत्तर देत असल्यास कोट टेक्स्ट ७ दिवसांनंतर उपलब्ध मिळणार आहे. जर कोणतेही डिसअपिरिंग मेसेज या नवीन फीचरला ऑफ ठेवण्यासाठी फॉरवर्ड केले जाते. तर मेसेज फॉरवर्ड चॅट गायब होणार नाही. वाचाः मेसेज गायब होण्याआधी आधीच्या चॅट्सला बॅकअप घेतल्यास तुम्ही गुगल ड्राइव्हवर पाहू शकतात. जर तुम्ही बॅकअप वरून डिसअपियर मेसेजला रिस्टोर करीत असाल तर असे शक्य नाही. कारण, ते मेसेज डिलीट होतील. व्हॉट्सअॅप युजर्स डिसअपियरींग मेसेजला फॉरवर्ड करण्यासोबत स्क्रीनशॉट करू शकतील. युजर्स डिसअपरियरिंग फोटो आणि व्हिडिओ ला गॅलरीत सेव करू शकतील. यासाठी Save to Camera Roll ऑप्शन असणार आहे. Disappearing Messages फीचर iOS, अँड्रॉयड, KaiOS आणि वेब/डेस्कटॉप युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. हे फीचर बाय डिफॉल्ट व्हॉट्सअॅप मध्ये इनेबल नसणार आहे. युजर्सला मॅन्यूअली इनेबल करावे लागेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ehbQBD