Full Width(True/False)

२०२०मध्ये 'या' मराठी कलाकारांनी स्वतःची दखल घ्यायला पाडलं भाग

पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मजलमूळच्या सोलापुरामधील यानं चित्रपटसृष्टीत पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मंच गाजवला आहे. यापूर्वी अक्षयनं दिग्दर्शित केलेला 'त्रिज्या' या मराठी सिनेमाला चीनमधल्या २२व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचांमध्ये स्थान, 'न्यू एशियन टॅलेंट'साठी नामांकन आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'क्रिस्टल बेअर'साठी नामांकन मिळालं होतं. आता पुन्हा एकदा अक्षयनं 'स्थलपुराण'च्या निमित्तानं जागतिक पातळीवर स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलंय. आशिया खंडाचा अॅकॅडमी अॅवॉर्ड अशी ओळख असलेला 'यंग सिनेमा अॅवॉर्ड' हा पुरस्कार यंदा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर याला जाहीर झालाय. सिनेजगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 'स्थलपुराण' या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्याला या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. यापूर्वी 'स्थलपुराण' हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही नावाजला गेलाय. सिनेमॅटोग्राफीचं कौतुक अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेला 'एके वर्सेस एके' हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. कलाकारांच्या अभिनयासह सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीबाबत देखील समीक्षक आणि जाणकार कौतुक करतायत. प्रेक्षकांना देखील सिनेमातील छायांकन आवडलं आहे. या सिनेमाच्या कॅमेऱ्यामागील डोळा हा एका मराठी सिनेमॅटोग्राफरचा आहे. असं या कलंदर सिनेमॅटोग्राफरच नाव आहे. यापूर्वी वेबवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजसाठी देखील त्यानं छायांकनचं काम केलंय. तसंच 'धप्पा' आणि 'न्यूटन' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे छायांकन देखील स्वप्नील यानं केलं आहे. खडतर प्रवासातून मार्गभंडारा जिल्ह्यातील तुमसर या गावातील होतकरु आणि सामाजिक जाणीव असलेल्या रोशन भोंडेकर या तरुणाच्या 'द शूज' या लघुपटानं संपूर्ण जगात महाराष्ट्राचं नाव गाजवलं. अमेरिकेतील सॅन डियगो येथे झालेल्या ग्लोबल फिल्म कॉमपेडिशन या स्पर्धेत 'द शूज'चा विशेष सन्मान करण्यात आला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील इंजिनिअरिंगची पदवी असलेल्या रोशनची हा दुसरा लघुपट आहे. रोशनच्या आयुष्याचा प्रवास खडतर होता. गरिबीतून वर येताना अनेक संघर्ष त्याला करावे लागले. घरची हालाखिची परिस्थिती लक्षात घेत त्यातून पडण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हे रोशनला ठाऊक होते. सध्या स्पेनमध्ये नोकरी करण्यासोबतच तो फिल्ममेकिंग सुद्धा करतोय. रोशनच्या 'हौसला और रास्ते' या पहिल्या लघुपटानं देखील अनेक पारितोषिकं जिंकली आहेत. लेखनाची वाहवा 'थप्पड' या सिनेमाचं कौतुक झालं तितकंच कौतुक प्रेक्षक आणि समीक्षकांनी सिनेमाच्या लिखाणाचंही केलं. अनुभव सिन्हा दिग्दर्शित हा सिनेमा यंदाच्यानवर्षी फेब्रूवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे दिग्दर्शक अनुभव यांच्यासोबत या चित्रपटाचे कथानक मराठमोळी अभिनेत्री हिनं लिहिले आहे. घरात अभिनयाची पार्श्वभूमी असली तरी आज मृण्मयीनं स्वतःची अशी स्वतंत्र ओळख मनोरंजन सृष्टीत निर्माण केली आहे. यापूर्वी मृण्मयीनं 'दंगल', 'पीके', 'गुलाब गॅंग' सारख्या गाजलेल्या सिनेमांसाठी स्क्रिप्ट सुपरव्हायजरचं काम पाहिलं आहे. तसंच 'तलाश', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'थ्री इडियट्स' चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. संकलन : मुंबई टाइम्स टीम


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2L63aUi