मुंबई:करोनाचं सावट असतानाही सकारात्मरीत्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तुम्ही सगळेच सज्ज झाला असणार...अनेकांचे छोटे होईना पण 'थर्टी फर्स्ट नाईट'चे प्लॅन्सदेखील ठरले असतील. तुमच्या या पार्टीत तुम्हाला धम्माल मराठी गाणी वाजवून झिगांट डान्स करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशाच काही गाण्यांची लिस्ट....ही भन्नाट गाणी पार्टीमध्ये वाजवून तुम्ही भाव खाऊन जाऊ शकता.... 'झिंग...झिंग... ' गेली तीन चार वर्षे या गाण्याशिवाय न्यू इयर पार्टी पूर्ण झाल्याच नसतील. वाचा:शांताबाई ...रूपाची खान, दिसती छान, लाखात छान... शांताबाई गाण्यासोबतचं लाइटिंगही महत्त्वाची मिट्ट काळोख, त्यात मध्येच येणारा हलकासा पांढरा प्रकाश आणि त्यात चमचमणारे कपडे घालून नाचणारी मंडळी…हा माहोल यंदा बऱ्याचशा घरात आणि न्यू इयर पार्ट्यांमध्ये बघायला मिळणार आहे.नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी दरवर्षी काही ना काही नवीन ट्रेंड्स पाहायला मिळतात. यंदाही असेच काही ट्रेंड्स पार्ट्यांमध्ये बघायला मिळणार असून, त्यात सर्वाधिक चर्चा आहे ती लाइटिंग ट्रेंड्सची. या चमचमत्या माहोलमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. न्यू इयर पार्टीसाठी कायम वेगवेगळ्या थीमच्या शोधात तरुणाई असते. अगदी एलइडीपासून मिरची लाईट्सचा वापर करून सजावट करणं आणि त्यात वेगवेगळ्या प्रॉप्स वापरणं हा ट्रेंड गेली काही वर्ष बघायला मिळतोय. यंदा त्यातही वेगळेपणा आणत यूव्ही लाईट्स आणि ब्लॅक अँड व्हाइट हे वेगळे ट्रेंड्स बघायला मिळणार आहेत. यूव्ही लाईट्स हे निळसर रंगाचे असतात. त्यात पांढरा किंवा कोणताही फिकट रंग चमकतो. गडद रंग मात्र यात दिसत नाहीत. डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजे ला... ही पोली साजुक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद... वाचा:
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38O0dQb