मुंबई- अभिनेता सलमान खानने करोना काळात शेती करण्याचा नवा ट्रेंड सुरू केला. यावेळी अभिनेत्याने आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर बराच काळ घालवला. संपूर्ण पावसाळा तो तिथेच होता. यामुळे त्याने तिथे भात लावणी- पेरणी केली. आता सलमान खानचा आणखी एक फोटो समोर आला असून तो पुन्हा एकदा शेती करताना दिसत आहे. सलमान खानने केली शेती व्हायरल फोटोत पुन्हा शेती करताना दिसला आहे. त्याच्या हातात फावडे असून तो शेतात नांगरणी करत आहे. सलमान अजूनही जमिनीशी जोडला असल्याचं पाहून त्याचे चाहते आनंदी आहेत. खुद्द सलमानने हा फोटो शेअर करताना, 'मदर अर्थ' असं कॅप्शनही दिलं आहे. देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आणि सलमानच्या या फोटोचा काही संबंध आहे की नाही हे सांगणं कठीण आहे. पण या संदर्भातल्या सोशल मीडियावर बऱ्याच प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. या व्हायरल फोटोत सलमानची खास स्टाइल चाहत्यांचं मन जिंकत आहे. विशेष म्हणजे पन्नाशीमध्ये असतानाही त्याचा फिटनेस पाहून अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत. लॉकडाउन दरम्यान अभिनेत्याने आपल्या शरीरावर बरीच मेहनत घेतली होती. त्याची हीच मेहनत आता या फोटोमध्ये दिसत आहे. सलमानची जबरदस्त बॉडी नुकताच सलमान खानने त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. पोस्ट वर्कआउटच्या त्या फोटोत सलमान आपली तगडी बॉडी आणि मसल्स दाखवत आहे. हा फोटो शेअर करताना सलमान खानने कॅप्शनमध्ये 'बीइंग स्ट्राँग' असे लिहिले. नेहमीप्रमाणे सलमानचा हा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी सलमान खानही बिग बॉसमुळे चर्चेत आहे. सलमानला नेहमीप्रमाणे होस्ट म्हणून पसंती दिली जात आहे. सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘ ’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या सिनेमात सलमानसोबत दिशा पाटणी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या वर्षी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा विचार सिनेमाची टीम करत आहे. या सिनेमानंतर सलमान पुन्हा 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत पहिल्यांदाच पूजा हेगडे काम करणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39Y6nzq