मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. केतकीला लहानपणापासून एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार हा आजार आहे. या आजाराबद्दल केतकी जनजागृती करण्याचाही प्रयत्न करत असते. या आजारामुळं समाजात कशा प्रकारचे अनुभव आले, ते अनेकदा केतकीनं शेअर केले आहेत. तिला नुकताच आलेला अनुभव केतकीनं व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितला आहे. दात दुखीच्या काही समस्यांमुळं केतकी नुकतीच एका डेंटिस्टकडं गेली होती. पण डेंटिस्टनं एपिलेप्सी असल्याचं कारण सांगत केतकीचा दात काढण्यास नकार दिला. याबद्दलचा एक व्हिडिओ केतकीनं शेअर केला आहे. काय म्हणाली केतकी?एका डेंटिस्टकडं गेले असताना मला जो अनुभव आला त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आपण नेहमीच एपिलेप्सी पेशंट्नसा दिल्या जाणाऱ्या वागणूकीबद्दल बोलतो. एपिलेप्सी असलेल्या लोकांना रोजच वेगवेगळे अनुभव येत असतात. आम्हाला कामावरूनही काढून टाकलं जातं. एका डेंटिस्टनं माझा दात काढायला नका दिलाय. डॉक्टर्स पण तुम्हाला एपिलेप्सी असल्यास अशा नजरेनं बघतात जसं काही एखादा गंभीर रोग झाला आहे. किंवा कोव्हिड घेऊन मी त्यांच्याकडं गेली आहे. एपिलेप्सीला स्वीकारा. एपिलेप्सी म्हणजे काय?फिट येणं, आकडी, मिरगी आदी नावांनी अपस्मार हा आजार ओळखला जातो. या आजारावर उपचार शक्य आहेत. औषधांनी तो बरा न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणं यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल. हा आजार जगभर आढळतो. लोकसंख्येच्या जवळपास एक टक्का, एवढे याचे प्रमाण आहे. या आजारामुळं खेळणं, पोहणं, वाहन चालवणं, रोजगार, शिक्षण, लग्न, सामाजिक प्रतिष्ठा अशा बऱ्याच गोष्टींपासून रुग्ण वंचित राहातो. लहान मुलांमध्ये हा प्रश्न अधिक बिकट आहे. योग्य त्या वयात आणि वेळीच अचूक निदान होऊन उपाचार न झाल्यास मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. मतिमंदत्व येतं. याच मुलांवर योग्य वेळी शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार झाले तर ती पूर्णतः सामान्य आयुष्य जगू शकतात.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qKVqqU