वृत्तसंस्था, नवी दिल्ली: जानेवारी २०२१ पासून गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. विशेषतः टेलिव्हिजन (टीव्ही), रेफ्रिजरेटर (), वॉशिंग मशिन यांसारख्या उपकरणांच्या किंमती सुमारे १० टक्क्यांनी वाढतील, असा अंदाज विविध कंपन्यांनी व्यक्त केला आहे. तांबे, अॅल्युमिनिअम व पोलाद यांच्या किंमतींत वाढ होत असल्यामुळे तसेच सागरी आणि हवाई वाहतुकीच्या शुल्कामध्ये वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅनलचा पुरवठा उत्पादकांकडून पुरेशा प्रमाणावर होत नसल्यामुळे या पॅनलच्या अर्थात ओपनसेलच्या किंमतींत दुपटीने वाढ झाली आहे. वाचाः कच्च्या खनिज तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून प्लास्टिकच्या किंमतींत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. यामुळे नाईलाजाने एलजी, पॅनासोनिक व थॉमसन या कंपन्यांनी टीव्हीच्या किंमती वाढवण्याचे ठरवले आहे. सोनी कंपनीने मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पॅनासोनिक इंडियाचे अध्यक्ष व सीईओ मनीश शर्मा यांच्या मते, येणाऱ्या काळात वस्तूंच्या किंमती वाढतील, जानेवारी महिन्यात त्या किमान ६ ते ७ टक्क्यांनी वाढतील. वाचाः पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर या किंमती १० ते ११ टक्क्यांनी वाढू शकतील. असा प्रकारे मान्यताप्राप्त ब्रॅण्डनी आपल्या उत्पादनांच्या किंमतींत वाढ केल्यास त्याचा परिणाम पुढील तिमाहीत वस्तूंची मागणी घटण्यात होणार असल्याची भीती कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड अॅप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात सीमा या संघटनेने व्यक्त केली आहे. सीमा संघटना आणि फ्रॉस्ट अॅण्ड सुलिवन यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या अहवालानुसार ग्राहकोपयोगी वस्तूंचा उद्योग २०१८-१९ मध्ये ७६ हजार ४०० कोटी रुपयांचा आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rwXu6d