Full Width(True/False)

पुन्हा 'सामना' रंगण्याची शक्यता; कंगना मुंबईत परतली

मुंबई: वादग्रस्त वक्तव्ये, ट्विस्ट्स यामुळं सतत चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री आता पुन्हा एकदा मुंबईत परतली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी कंगनानं मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं तिचं पुन्हा मुंबईत येणं चर्चेत आलं आहे.सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कंगना आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य रविवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?' असं ट्विट केल्यानंतर कंगनानं आणखी एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. 'मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा', असं थेट आव्हान कंगनानं दिलं होतं.यानंतर कंगना मुंबईत आली होती. चार दिवसांतच मनालीला परतली होती. कंगनानं मुंबई, मुंबई पोलीस, राज्य सरकार व शिवसेनेबद्दल आक्षेपार्ह मतं व्यक्त केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. त्याची परिणती कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईत झाली होती. कंगनानं या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबईला 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणणाऱ्या व विशिष्ट व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या कंगना राणावत हिला देखील खंडपीठानं समज दिली होती. कंगनानं भविष्यात असं ट्वीट करणं टाळावं, असंही न्यायालयानं सांगितलं. कार्यालयावर कारवाई सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगनानं मुंबई पोलिसांवर अकार्यक्षमतेचे आरोप केले होते. त्यानंतर ती शिवसेनेच्या टीकेच्या रडारवर आली होती. पुढं नेते व कंगनामध्ये शाब्दिक युद्धही रंगलं. शिवसेना नेत्यांना उत्तर देताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी झाल्याचं वक्तव्य कंगनानं केलं होतं. या वादानंतर मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. गेल्या काही दिवसांपासून कंगना तिच्या आगामी 'थलाइवी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. येत्या नवीन वर्षात कंगनाच्या हाती अनेक चित्रपट असल्याची माहिती आहे. तसंच काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या 'धाकड' चित्रपटाचीही घोषणा केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34KbtMk