Full Width(True/False)

काय आहेत बॉलिवूड सेलिब्रिटींचे यंदाचे न्यू इयर प्लॅन्स?

निसर्गाला जपू या मी वर्षाचा शेवटचा आठवडा स्वतःसाठी राखून ठेवलेला असतो. रिसेट होण्यासाठी मी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवते. यंदाचं नवं वर्षही मी निसर्गाच्या कुशीत साजरं करणार आहे. आपण सर्वांनी मिळून निसर्गाला खूप जपायला हवंय. कोसळलेल्या कुटुंबांना येणाऱ्या वर्षानं आधार द्यावा, असं मनापासून वाटतंय. तसंच माझ्या काही सीरिज आणि सिनेमे या वर्षी प्रदर्शित होतील अशी अपेक्षा आहे. - , अभिनेत्री मार्गी लागावं सगळं सध्या एका सिनेमाचं चित्रीकरण करत असल्यामुळे खूप व्यग्र वेळापत्रक आहे. २०२१मध्ये हळूहळू सगळं काही पूर्वपदावर यावं अशी आशा आहे. नियती आपली साथ देईल असा विश्वास वाटतो. लोकांच्या मनातली चिंता, भीती दूर व्हावी. २०२० ने अनेक समस्या निर्माण केल्या. या सर्व समस्यांवर २०२१ हे वर्ष तोडगा काढेल, असं वाटतंय. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागावा अशी इच्छा आहे. - रिचा चड्ढा, अभिनेत्री कुटुंबियांसमवेत नवं वर्ष माझी मुलं आर्यमान आणि धरम या माझ्या मुलांबरोबर मी नवं वर्ष साजरं करणार आहे. नव्या वर्षात परस्परांमधील प्रेम वाढावं आणि नकारात्मकता दूर व्हावी अशी आशा आहे. देवाकडे मागणं आहे की माझं काम पुन्हा एकदा प्रेक्षकांनी आवडीने बघावं आणि सगळं काही पहिल्यासारखं व्हावं - बॉबी देओल, अभिनेता सुख, शांती आणि आनंदमी ३० डिसेंबरपर्यंत चित्रीकरण करणार आहे. येणारं नवीन वर्ष सुख, शांती आणि आनंद घेऊन येईल याबद्दल विश्वास आहे. २०२० या वर्षाने खूप कठीण परिस्थिती दाखवली. नव्या वर्षावर ही दुःखाची सावली अजिबात पडता कामा नये. लवकरात लवकर मुलांच्या शाळा सुरू व्हायला हव्यात. ऑनलाइन क्लासेसमुळे त्यांना मजा मस्ती करता येत नाहीय. - सुप्रिया पाठक, अभिनेत्री लस यावी नवीन वर्ष मी माझ्या परिवारासोबत सुरक्षित राहून साजरं करणार आहे. नव्या वर्षात करोनावरची लस यावी आणि त्याच्या संसर्गापासून आपल्या सगळ्यांची सुटका व्हावी अशी इच्छा आहे. लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या सगळ्यांना पुन्हा एकदा नोकऱ्या मिळायला हव्यात. प्रेक्षक पुन्हा एकदा सिनेमागृहांकडे वळायला हवेत. यामुळे सिनेइंडस्ट्री पुन्हा उभी राहू शकेल. - कियारा अडवाणी, अभिनेत्री भरभरून प्रेम करावं१ जानेवारी खूप विशेष असणार आहे. त्यादिवशी 'रामप्रसाद की तेरहवी' हा माझा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा लोकांना आवडावा अशी आशा आहे. नव्या वर्षात माझ्या वेब सीरिज, शॉर्ट फिल्म्सवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करावं आणि त्या यशस्वी व्हाव्यात. या वर्षी कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रेक्षकांनी आदर आणि स्वीकार करावा अशी अपेक्षा आहे. नव्या वर्षात करोनावरची लस येणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. - कोंकना सेन शर्मा, अभिनेत्री संकलन - गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pl9V3k