Full Width(True/False)

वाईनसोबत बिस्कीट खाणाऱ्या स्वरा भास्करला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असते. ख्रिसमसनिमित्तानं स्वरानं शेअर केलेला एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी स्वराला प्रचंड ट्रोल केलं आहे. ख्रिसमसनिमित्त शेअर केलेल्या या व्हिडिओत स्वरा वाईन पिताना दिसतेय. तुम्ही म्हणाल यात ट्रोल करण्यासारखं काय आहे? तर स्वरा वाईनमध्ये चक्क खाताना दिसतेय. म्हणून नेटकऱ्यांनी स्वराची खिल्ली उडवली आहे. 'वाईनसोबत असं बिस्कीट खाण्याची मजा काही निराळीच असते. असं बिस्किट वाईनमध्ये बुडवा आणि ते विरघळण्याच्या आतच खाऊन टाका', असं स्वरा या व्हिडिओत सांगताना दिसतेय. चहासोबत खातात, वाईनसोबत नाही, असं एकानं म्हटलं आहे. तर, ताई तुला वेड तर नाही लागलं ना? असं म्हणत अनेकांनी ट्रोल केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ho6RR6