मुंबई: अभिनेत्री हिचा दोन दिवसांपूर्वी निकाह झालाय. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. निकाहच्या दोन दिवसांनी गौहर शूटिंगनिमित्तानं विमानप्रवास करत असतानात विमानात गौहरची भेट तिच्या एक्स बॉफ्रेंडसोबत झाली. नवविवाहीत गौहर एक्स बॉयफ्रेंडला भेटली म्हटल्यावर चर्चा तर होणारच! त्याचं झालं असं की, निकाह झाल्यानंतर दोन दिवसांनी गौहरनं कामाला सुरुवात केली. गौहर लखनऊ इथं शूटिंगला जात होतं. यादरम्यान तिची भेट एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडन याच्यासोबत झाली. तो तिला अचानक विमानात भेटला. 'मी माझ्या घरी जात होतो अन् अचानक एक जुनी मैत्रिण मला भेटली. नुकतंच तिचं लग्न झालंय आणि ती खूप सुंदर दिसतेय. ही मैत्रीण आहे गौहर खान. तुझ्यासाठी मी खूप आनंदी आहे. हाय किस्मत', असं कुशालनं एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. बिग बॉसमध्ये अफेअर्सच्या चर्चाबिग बॉस हिंदीच्या सातव्या पर्वात कुशल आणि गौहर सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतरही ही जोडी अनेकदा एकत्र दिसायची. परंतु दोघांनी नंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग करणाऱ्या गौहरनं २५ डिसेंबरला बॉयफ्रेंड जैद दरबारशी लग्न केलं. हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hlIQds