Full Width(True/False)

'सुहेलदेव' चित्रपटाला अक्षयचा नकार;समोर आलं खरं कारण

मुंबई: तारखांची अडचण आणि क्रिएटीव्ह मतभेदांमुळे '' हा चित्रपट करणार नसल्याचं कळतंय. यात अक्षयने मुख्य भूमिका साकारावी असं दिग्दर्शक अश्विन वर्दे यांना वाटत होतं. यासाठी अश्विन यांनी दिल्लीला जाऊन अक्कीची भेट घेतली होती. कथा ऐकल्यानंतर अक्षयला असं वाटलं की, हा मोठा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे पटकथा पुन्हा तयार करण्याची गरज आहे. क्रिएटीव्ह मतभेदांव्यतिरिक्त तारखा न मिळणं हादेखील मुख्य मुद्दा आहे. कारण, पुढील दोन वर्षांसाठी अक्षयने अनेक चित्रपट स्वीकारले आहेत. सध्या तो 'पृथ्वीराज' चित्रपटात व्यग्र आहे. त्यामुळे यांच्या '' या कादंबरीवर आधारित 'सुहेलदेव' हा चित्रपट अक्षयने नाकारल्याचं समजतंय. '' या सिनेमाची पूर्वतयारी गेल्या काही वर्षांत बॉलिवूडनं चरित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला होता. येत्या वर्षातही काही बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण, बॉलिवूडनं पौराणिक कथानकांकडे विशेष लक्ष द्यायचं ठरवलं आहे. विविध पौराणिक कथानकांवर आधारित असलेले नवे सहा चित्रपट येत्या वर्षांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यात 'रामायण', 'महाभारत', 'अश्वत्थामा', 'हनुमान' या कथांचा समावेश आहे. यातील काही सिनेमे पूर्णपणे पौराणिक पात्रांवर आधारित आहेत. तर काही प्रासंगिक सिनेमांमध्ये पौराणिक पात्रांचा समावेश करण्यात आला आहे.अभिनेता अक्षय कुमारनं त्याच्या आगामी 'राम सेतू' या सिनेमाची पूर्वतयारीदेखील सुरू केल्याचं कळतंय. या चित्रपटांचं बजेट हे तब्बल चारशे कोटींच्या घरात असल्याचं बोललं जातंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37R0W3Q