मुंबई- जुही चावलाचं हिऱ्याचं कानातलं हरवलं आहे. ते शोधण्यासाठी आता तिने सोशल मीडियावरील यूझर्सकडे मदत मागितली आहे. रविवारी रात्री अभिनेत्रीने तिच्या एका ट्विटर पोस्टमध्ये तिच्या एका कानातलं पडल्याचं सांगितलं. यासोबतच तिने एक खास मेजेही शेअर केला आहे. जुहीने तिच्या कानातल्याचा एक फोटो शेअर केला. यासोबतच तिने सांगितलं की जवळपास १५ वर्ष या कानातल्याची जोडी ती दररोज वापरत आहे. याचमुळे तिचं एक भावनिक नातं त्या कानातल्यांसोबत तयार झालं आहे. जुही ते हिऱ्याचे कानातले दररोज वापरायची. तिने कानातल्याबद्दल माहिती देताना लिहिले की, 'आज सकाळी मी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ च्या ८ व्या गेटकडे जात होते. चेक इन करत, सुरक्षा तपासणी करत असताना माझं कानातलं कुठे तरी पडलं.' जुही चावलाने पुरस्कार देण्याचीही दाखवली तयारी अभिनेत्रीने पुढे लिहिले की, 'एखाद्याने मला ते कानातलं शोधून देण्यात मदत केली तर मला आवडेल. कृपया पोलिसांना कळवा आणि मी तुम्हाला बक्षीस देईन. हे एक मॅचिंग पीस आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून जवळपास दररोज वापरत आहे. ते शोधण्यात मला मदत करा.. धन्यवाद.' सोशल मीडियावर सक्रिय बॉलीवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती चाहत्यांसोबत त्यांच्याशी थेट संवाद साधते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oNko7l
