मुंबई: अभिनेत्री सई लोकूर लवकरच 'सनम हॉटलाइन' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तिची मुख्य भूमिका असून, तिच्यासोबत असणार आहे 'बिग बॉस मराठी'मधला तिचा सहस्पर्धक-मित्र अभिनेता पुष्कर जोग. या सीरिजची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. त्यातल्या सईच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. खंडणीच्या जाळ्यात अडकलेल्या तीन जणांची गोष्ट या सीरिजमधून बघायला मिळणार असून ती मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये दिसणार आहे. नुकताच पार पडला विवाहसोहळासई लोकूर ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. सईचा लाइफ पार्टनर कोण असेल, याबद्दलही तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. असं सईच्या पतीचं नाव आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात असताना सईच्या लव्ह लाइफबद्दल तिनं खुलासे केले होते. तसंच पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यात 'कुछ तो गडबड है' अशी चर्चाही रंगली होती. 'बिग बॉस'च्या घरात दोघांचं चांगलं जमत होतं. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वावरताना दिसलेली. दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं, सईच्या मनोरंजनासाठी पुष्करनं आयटम नंबरवर डान्स करणं किंवा जेवणावेळी पुष्करच्या ताटात सईनं जेवण करणं. त्यावर घरातल्या इतर सदस्यांनी 'प्यार बाटने से बढता है' म्हणत दोघांची टर उडवणं. या प्रसंगांतून दोघांमधील मैत्रीचं नातं आता नवीन वळण घेतं की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gBTnAL
