मुंबई: ‘’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या याच्या अभिनयाचं कौतुक होतंय. ज्योतिबाच्या अवताराची गोष्ट या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. ज्योतिबांच्या उन्मेष अश्वाची गोष्ट काही दिवसांनी मालिकेत पाहायला मिळणार आहे. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार असणाऱ्या ज्योतिबाच्या कथा अनेकांनी वाचल्या असतील. पण हा घोडा पांढऱ्या रंगाचा का?, ज्योतिबाला हा घोडा कुणी भेट दिला? यामागची कथा मालिकेतून उलगडणार आहे. ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशालनं मालिकेसाठी घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं आहे. 'कोहिनूरबरोबर माझी खास मैत्री झाली आहे. माझ्याकडून घोडेस्वारी करताना काही चूक झाली तरी तो मला सांभाळून घेतो. मी सेटवर आल्यावर पहिली कोणाची भेट घेत असेन तर तो आहे कोहिनूर. त्याला खाऊ घालणं त्याच्याशी गप्पा मारणं हे मला आवडतं. ज्योतिबाची भूमिका साकारण्यासाठी कोहिनूरचाही खूप मोलाचा वाटा आहे', असं विशालनं सांगितलं. नावाप्रमाणेच हा घोडा कोहिनूर असल्याचंही त्यानं सांगितलं. मालिकेतल्या उन्मेश अश्वाची गोष्ट सांगणाऱ्या प्रसंगासाठी सेटवर कोहिनूर नावाच्या घोड्याची खास एंट्री झाली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o2eE9R