Full Width(True/False)

'सुपरफास्ट' चार्जिंग स्पीडचे स्मार्टफोन्स, फीचर्सही जबरदस्त

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोन्स पूर्णपणे बदलले आहेत. सुरुवातीला बॅटरी लाइफची काही युजर्संना फार चिंता वाटत होती. परंतु, आता स्मार्टफोन्समध्ये फास्ट चार्जिंग, वायरलेस चार्जिंग आणि लाँग लास्टिंग बॅटरी लाइफ यासारखे फीचर्स दिले जात आहेत. म्हणजेच जर तुम्हाला लवकर फोन चार्ज करायचा असेल तर हे फोन तुम्हाला मदत करतील. जाणून घ्या बेस्ट फास्ट चार्जिंग फोन्ससंबंधी. वाचाः OnePlus 8T वनप्लसच्या या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये Wrap Charge 65 टेक्नोलॉजी सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी ३९ मिनिटात फुल चार्ज होते. या फोनमध्ये ६.५५ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर यासारखे खास फीचर्स दिले आहेत. या फोनची किंमत ४२ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. वाचाः Realme 7 Pro रियलमीच्या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये पूर्ण दिवस बॅटरी बॅकअप देते. बेस्ट फास्ट चार्जिंग फोन्सपैकी हा एक फोन आहे. यात ६५ वॉट सुपरडार्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्ट करतो. फोनमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० प्रोसेसर दिला आहे या फोनची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Samsung Galaxy S20 Ultra सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा जगातील पहिला फ्लॅगशीप फोन्सपैकी एक आहे. या फोनला ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. यात ६.९ इंचाचा डिस्प्ले आणि एक्सीनॉस ९९० प्रोसेसर दिला आहे. वाचाः Vivo V19 विवोच्या या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट फ्लॅश चार्ज २.० चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये ६.९ इंचाचा डिस्प्ले आणि एक्सीनॉस ९९० प्रोसेसर दिला आहे. या फोनची किंमत २४ हजार ९९० रुपये आहे. वाचाः Xiaomi Mi 10 5G शाओमीच्या या फोनमध्ये फास्ट चार्जिंग स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ३० वॉट वायरलेस फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये सॅमसंगचा एक्सिनॉस ९९० प्रोसेसर आणि ६.९ इंचाची स्क्रीन दिली आहे. या फोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Oppo Reno4 Pro ओप्पोच्या या फोनमध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे. ६५ वॉट चार्जिंग सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये ६.९ इंचाची स्क्रीन आणि एक्सिनॉस ९९० प्रोसेसर दिला आहे. या फोनची किंमत ३४ हजार ९९० रुपये आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hvhgKK