Full Width(True/False)

तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर

मुंबई: अमलीपदार्थ प्रकरणात जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री हिचा भाऊ याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविकला सशर्त जामीन मंजूर केलाय. रिया चक्रवर्तीसह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला असताना, शौविक व अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास करत असताना सीबीआयच्या विशेष पथकाला तपासादरम्यान अंमली पदार्थांसंबंधी रिया व सॅम्युएल यांच्यातील चॅटची माहिती मिळाली होती. त्यावरून एनसीबीनं तपास सुरू केला होता. या दरम्यान, एनसीबीने अंमली पदार्थांच्या दोन दलालांना वांद्रे परिसरातून अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने शौविक व सॅम्युएलला समन्स बजावले होते. त्यानंतर सॅम्युएल हा दलालांकडून अंमली पदार्थांचा साठा मिळवत होता. हे अंमली पदार्थ तो शौविकमार्फत रियाला पुरवत होता. रिया सॅम्युएल व शौविकच्या सल्ल्यानुसार ते अंमली पदार्थ सुशांतसिंहला छुप्या पद्धतीने देत होती, असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. यामुळेच अधिक तपासासाठी एनसीबीने अटकेची कारवाई केली होती. तब्बल तीन महिन्यांनंतर शौविकला जामीन मंजूर करण्यात आला आहेत. तर रिया देखील महिनाभार भायखळ्याच्या तुरुंगात होती. रियाला मिळाला असताना शौविक चक्रवर्ती याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळून लावला होता. शौविक ड्रग्ज डिलर्सच्या थेट संपर्कात होता, असं कारण देत न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mwfvil