Full Width(True/False)

'त्या' एका मेसेजनं सुरू झाली होती प्रियांका आणि निकची लव्हस्टोरी

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या लग्नाला काल म्हणजेच १ डिसेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. प्रियांकानं पती निक जोनसला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. दोघांची केमेस्ट्री नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पण तुम्हाला माहित आहे का, यांच्या नात्याची सुरुवात एका खास मेसेजने झाली होती. प्रियांका आणि निक यांची लव्हस्टोरी म्हणजे नेहमीच गॉसिपचा विषय ठरतो.एका कार्यक्रमात बोलताना प्रियांकानं त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात एका टेक्स्ट मेसेजनं झाल्याचं गुपित सांगितलं आहे.प्रियांका आणि निक एका पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदा एकमेकांना भेटले असंच सर्वांना माहित आहे. परंतु प्रियांका-निक यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात एका टेक्स्ट मेसेजनं झाली आहे. मैत्रीच्या नात्याला आणखी खास बनवण्यासाठी प्रियांकानं नव्हे तर निकनं पुढाकार घेतला होता. निकनं अनेकदा आपल्या मनातील भावना प्रियंकाशी शेअर केल्या. काही दिवसांच्या भेटीगाठीनंतर निकनं प्रियांकाला एक मेसेज केला होता, 'आई थिंक वी शुड कनेक्ट' ( मला वाटतं आपण एकमेकांना वेळ द्यायला हवा, बोलायला हवं). निकच्या या मेसेजनंतर दोघांमधील नातं आणखी घट्ट होत गेलं. त्यानंतर दोघंही एकत्र दिसू लागले. कधी हे दोघं न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमधून हात पकडून बाहेर पडताना दिसले तर कधी एकत्र सायकल चालवताना दिसले होते. त्यानंतर साखरपुडा करून प्रियांका आणि निकनं त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33vSYuz