मुंबई: बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर-खान गरोदरपणातही काम करताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी तिने '' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. नुकतंच करीना एका मुलाखतीत सांगितलं की, 'गरोदरपणात काम करणं अयोग्य नाही'. तिने हेदेखील सांगितलं की, तिच्या कुटुंबानं तिला घरी राहायला सांगितलं आहे. पण, तरीदेखील तिला काम करणं गरजेचं वाटतं. कारण, तिला ठरवलेली कामं पूर्ण करायची आहेत. सध्या करोनाच्या काळात करीना कपूर-खानने काम करण्याबद्दल सांगितलं की, 'सर्व खबरदारी घेऊन आणि नियमांचं पालन करुन काम करणं चुकीचं नाही. म्हणजे कोणता आजार नाही. कठीण काळात स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे, हे मान्य आहे. पण, अशा अवस्थेत काम करू शकत नाही अशी कारणं देऊन मी गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी तशी नाही. हो, माझे पालक आणि इतर लोकांनी मला घरी राहायला सांगितलं आहे. पण, मी घरी बसू शकत नाही. मला काम करायला आवडतं'. पुढे करीना म्हणाली की, 'जेव्हा मी 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाचं शूटिंग सुरु केलं तेव्हा माहीत नव्हतं की करोना नामक संकट येईल. चित्रपटाचं शूटिंग एप्रिलमध्ये संपणार होतं. पण, करोनानं सगळं काही बदललं. त्यानंतर मी कोणताच सिनेमा साइन केला नाही. आता त्या सर्व कमिटमेंट्स पूर्ण करत आहे'.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Vp1XJC