मुंबई: अमली पदार्थ प्रकरणामुळे कॉमेडियन व तिचा पती चर्चेत आले होते. त्यांच्या घरी गांजा सापडल्यानं दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर दोघांना जामीन मंजूर करण्यात आला. हा वाद इथंच संपला नसून कपिल शर्माच्या शोमधूनही तिला काढून टाकण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. हे सर्व सुरू असतानाच हर्ष लिंबाचिया यानं भारतीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेl. हर्षनं भारतीसाठी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. हर्षनं भारतीसोबतचे काही रोमॅन्टीक फोटो शेअर केले आहेत.'आपण एकत्र असताना मला कशाचीही चिंता नाही', असं हर्षनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या निमित्ताने बॉलीवूडमधील अमली पदार्थ वापराचा पर्दाफाश पुन्हा झाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) कसून तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत आजपर्यंत हिंदी सिने-टीव्हीसृष्टीतील अनेकांची आजपर्यंत चौकशी झाली आहे. भारतीच्या अंधेरी, वर्सोवा येथील घरावर व कार्यालयावर शनिवारी छापा टाकला असता, ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. तसंच गांजाचं सेवन करत असल्याची कबुली भारती व हर्षनं दिली, असा दावा एनसीबीनं केला. भारतीला आणि हर्षला पहाटे अटक केल्यानंतर एनसीबीने दोघांनाही सुटीकालीन न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होतं. त्यानंतर दोघांतर्फे अॅड. अयाझ खान यांनी लगेचच जामीन अर्ज सादर केले होते . त्यानंतर दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मंजूर करतानाच एनसीबीला तपासात पूर्ण सहकार्य करावे आणि साक्षीपुराव्यांविषयी छेडछाड करू नये, अशा अटीही न्यायालयानं घातल्या.आहेत. कोण आहे भारती सिंग? द ग्रेट इंडियन लॉफ्टर शो' मुळे भारती सिंग प्रथम प्रकाशात आली. 'लाली' ही लहान मुलीची व्यक्तिरेखा निर्माण करुन त्यातून तिने केलेले विनोद प्रेक्षकांनी उचलून धरले. शाब्दिक कोट्या, हजरजबाबीपणा आणि उत्स्फूर्त परिस्थितीजन्य विनोद यामुळे ती लोकप्रिय झाली. 'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी का तानसेन', 'कॉमेडी नाइट्स' अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना तिला सूत्रसंचालन करण्याची स्वतःची कुवत लक्षात आली. त्यानंतर भारतीने 'झलक दिखलाजा', 'डान्स दिवाने', 'नच बलिये', 'इंडिया हॅज गॉट चॅलेंज', 'कपील शर्मा शो', 'खतरोंके खिलाडी' अशा कार्यक्रमांमधून सूत्रधाराच्या भूमिकेतही विनोदाची पेरणी केली आणि या कार्यक्रमांना एक वेगळा पैलू दिला. तिचे पती हर्ष लिंबचिया हेही मनोरंजन उद्योगातच आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lsZvfu