Full Width(True/False)

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत येणार मोठा ट्वि्स्ट; शनाया...

मुंबई: गेली तीन वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी '' ही मालिका आजही लोकप्रिय आहे. या मालिकेतल्या व्यक्तिरेखाही नेहमीच चर्चेत राहतात. या व्यक्तिरेखेबद्दल तर नेहमीच बोललं जातं. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रसिका सुनीलच्या सहज अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. आता तिच्याबद्दलचीच एक बातमी समोर आली आहे. मधल्या काळात रसिका शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यामुळे मालिकेतून तिची एक्झिट झाली होती. तिच्या जागी अभिनेत्री इशा केसकरची वर्णी लागली होती. आता पुन्हा एकदा रसिका अमेरिकेला जाणार असल्याचं समजतंय. यामुळे तिची पुन्हा एकदा मालिकेतून एक्झिट होणार का? अशी चर्चा रंगली आहे. पण, यावेळी तिच्या जागी दुसरं कोणीही येणार नाहीय. येणार मोठा ट्विस्ट?उलट, तिचं पात्र वगळून मालिकेची पटकथा रचली जाणार असल्याचं समजतंय. सध्या शनायाचा पूर्व प्रियकर आणि दुसऱ्या लग्नाबद्दल बोललं जातंय. त्यामुळे येत्या काही एपिसोडमध्ये तिचं लग्न लावून, ती दुसऱ्या देशात स्थायिक होईल असं दाखवणार असल्याचंही कळतंय. त्यामुळे शनाया ही व्यक्तिरेखाच मालिकेतून तुर्तास तरी एक्झिट होणार आहे, असं दिसतंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2LUVjJB