मुंबई- देशभरातील शेतकरी केंद्र सरकारच्या वादग्रस्त शेती कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. यातही पंजाब- हरियाणामधील शेतकरी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी होत आहेत. याच आंदोलनामुळे आता याच्या '' सिनेमाचं चित्रीकरणा पुढे ढकलण्यात आलं आहे. या सिनेमातील बहुतांश भागाचं चित्रीकरण पंजाबमधील चंदीगड येथे सुरू आहे. चंदिगडशिवाय या सिनेमाचं चित्रीकरण कसोलं आणि देहरादूनमध्येही होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांचं आंदोलन पाहून निर्मात्यांनी चंदिगडमधलं चित्रीकरण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात सिनेमाची संपूर्ण टीम देहरादूनमध्ये पुढील चित्रीकरणासाठी रवाना झाली. शाहिद आणि मृणाल ठाकूर आता काही दिवस देहरादूनमध्ये शूटिंग करणार असून त्यानंतर चंदिगडला परत येऊन उरलेल्या तीन दिवसांचं शूटिंग पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शाहिद कपूरचा 'जर्सी' हा सिनेमा याच नावाने तयार करण्यात आलेल्या सुपरहिट तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. वाढत्या वयात संघात परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रिकेटपटूची भूमिका शाहिद कपूर या सिनेमात साकारताना दिसणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर व्यतिरिक्त या चित्रपटात शाहिदचे वडील पंकज कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33TGrBi