Full Width(True/False)

'तांडव' सीरिजचा टीझर रिलीज, एक डायलॉग पडला व्हिडिओवर भारी

मुंबई- सैफ अली खानची वेब सीरिज '' चा टीझर रिलीज झाला आहे. या सीरिजची कथा भारतीय राजकारणाभोवती फिरताना दिसते. या वेब सीरिजमध्ये राजकारण, दलित आणि यूपी पोलिसांच्या संबंधांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये सैफ मजबूत भूमिकेत दिसणार आहे. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांच्या प्रोडक्शनने 'तांडव 'या वेब सीरिजचा पहिला टीझर समोर आणला आहे. या टीझरच्या फक्त एका संवादाने साऱ्यांचं लक्ष स्वतःकडून वळून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये समूदाय आपल्या राजकीय नेत्याच्या घराच्या समोर उभे राहिलेले दिसत आहेत. तर त्या सर्वांचा नेता दाखवला आहे. यातच एक असा संवाद ऐकू येतो जो भूवया उंचवायला भाग पाडतो. या संपूर्ण व्हिडिओमध्ये फक्त एकच संवाद ऐकायला मिळतो. पण हाच एक संवाद संपूर्ण व्हिडिओवर भारी पडला आहे. 'या देशात जो आहे तोच राजा आहे.' या ओळीने साऱ्यांचं मन जिंकलं आहे. तांडव वेब सीरिजमध्ये सैफसोबतच डिंपल कपाडिया आणि सुनील ग्रोवरसारखे तडगे कलाकार काम करताना दिसणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित ही मालिका उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे. अॅमेझॉन प्राइमवर पुढच्या वर्षी १५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nuaDL9