नवी दिल्लीः केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषि कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारच्या या कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरीयाणामधील शेतकरी रस्त्यांवर उतरले आहेत. शेतकरी आंदोलनाला आता महिना उलटू गेला आहे. या आंदोलनाला हिंसक रूप मिळत आहे. या आंदोलना दरम्यान रिलायन्स जिओच्या मोबाइल टॉवरचे नुकसान करण्यात येत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या माहितीनुसार, पंजाबमध्ये ३.९ कोटी मोबाइलचा वापर करण्यात येत असून यात रिलायन्स जिओचे दीड कोटी ग्राहक आहेत. वाचाः वाचाः वाचाः पंजाबमध्ये आंदोलना दरम्यान, रिलायन्स जिओचे २ हजारांच्या जवळपास मोबाइल टॉवरला नुकसान पोहोचवले गेले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले परंतु, त्यांच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. गेल्या महिन्याभरात दीड हजारांहून जास्त मोबाइल टॉवरला नुकसान पोहोचवले गेले आहे, अशी माहिती समोर आली आहे. या कृषि कायद्याचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. रिलायन्स जिओने गेल्या काही दिवसात तोडफोडीमुळे काही टॉवरचे काम करायला सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८२६ साइट यामुळे डाउन होती. जिओचे जवळपास ९ हजार टेलिकॉम टॉवर आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KDfhs8