Full Width(True/False)

'बालक पालक' चित्रपटातील अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

मुंबई: लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना लग्नाचा मुहूर्त साधला आहे. या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री ही देखील नुकतीच विवाहबंधनात अडकली. शाश्वतीच्या लग्नाच्या फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोग्राफर राजेश करमारकर याच्यासोबत शाश्वती लग्नबंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं राजेशसोबत फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली होती. रवी जाधव यांच्या 'बालक पालक' या चित्रपटात शाश्वतीनं डॉली नावाची व्यक्तीरेखा साकारली होती. तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं होत. 'बालक पालक' या चित्रपटानंतर तिनं अनेक मराठी मालिकांमध्येही अभिनय केला आहे.

'बालक पालक' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून चमकल्यानंतर शाश्वती छोट्या पडद्यावर झळकली . 'चाहूल' या मालिकेत ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तसंच तिनं 'पक्के शेजारी' मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर मात्र तिने छोट्या पडद्यापासून लांब राहणंच पसंत केलं होतं. त्यानंतर ‘देहभान’ हे नाटक केलं.



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2LZ5sF7