Full Width(True/False)

कंगना रणौतने सर्वांसमोर सांगितलं लोक तिचा इतका द्वेष का करतात

मुंबई- आपल्या वक्तव्यामुळे आणि वादग्रस्त विधानांंमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या हिला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यांवरही कंगनाला लक्ष्य केलं गेलं. आता बिहारमधील गया येथील कोर्टात कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कंगनाने दोन ट्वीट करत लोकांना तिचा तिरस्कार का आहे हे सांगितले. कंगनाने तिचा फोटो शेअर करत म्हटलं की, 'मी नेहमीच सिनेसृष्टीबद्दल प्रामाणिक राहिले आहे. त्यामुळेच बहुतेकजण माझ्याविरुद्ध आहेत. मी आरक्षणाला विरोध केला तेव्हा बहुतेक हिंदूंनी माझा द्वेष करायला सुरुवात केली. अभिनेत्रीने पुढे लिहिले की, 'मणिकर्णिका' च्या प्रदर्शनावेळीही मी करणी सेनेशी भांडले होते आणि राजपूतांनी मला धमकावले होते. जेव्हा मी इस्लामिक कट्टरपंथांच्या विरोधात उभी होते, तेव्हा मुस्लिमांनी माझा द्वेष करायला सुरुवात केली. जर मी खलिस्तानियांना लढा दिला तर आता बहुतेक शीख माझ्या विरोधात आहेत. 'पंगा क्वीन'ने तिच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'माझे हितचिंतक मला सांगतात की माझ्यासारखे मतदारांना पळवून लावणाऱ्या व्यक्ती कोणत्याही पक्षाला आवडत नाही. त्यामुळे कुठलाच राजकीय पक्ष माझं कौतुक करत नाही हे जवळपास उघड आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना प्रश्न पडेल की मी या सर्व गोष्टी का करते? याचं उत्तर असं आहे की या जगाच्या पलीकडे, आणखी एक जग आहे, जिथे माझी अंतरात्मा आहे.. जिथे माझं कौतुक होतं. दरम्यान, दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत आरएलएसपीचे प्रदेश सरचिटणीस विनय कुशवाह यांनी आरोप केले आहेत की अभिनेत्री कंगना रणौत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्या फोटोवर आक्षेपार्ह भाष्य केले होते. उपेंद्र कुशवाहा यांनीही अभिनेत्री विरोधात ट्वीट केलं होतं. उपेंद्र यांनी कंगनावर आरोप करत म्हटलं की, तिने जुन्या आरएलएसपी निवडणुकीच्या बैठकीतील फोटोचा गैरवापर केला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gXbxx4