Full Width(True/False)

NCB ने करण जोहरला पाठवली नोटीस, त्या पार्टीचे मागितले सर्व डिटेल

मुंबई- पार्टीच्या व्हायरल व्हिडिओवरून नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो () ने बॉलिवूड सिनेनिर्माता याला समन्स बजावला आहे. एनसीबीने त्याला बी-टाउनमधील सेलिब्रिटींना दिलेल्या पार्टीचा संपूर्ण तपशील देण्यास सांगितलं आहे. अकाली दलाचे नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी एनसीबीकडे या पार्टीबद्दल तक्रार केली होती. करण जोहरला२०१९ मध्ये केलेल्या या पार्टीशी संबंधीत सर्व तपशील एनसीबीला द्यावेच लागणार आहेत. पार्टीत कोण- कोण आलं होतं? कोणत्या कॅमेर्‍याने व्हिडिओ शूट केला? कोणाला आमंत्रण पत्र पाठवलं गेलं होतं? अशाप्रकारचे तपशील करणला द्यावे लागणार आहेत. विशेष म्हणजे आज शुक्रवारी १८ डिसेंबरपर्यंत ही सर्व माहिती त्याला द्यावी लागणार आहे. आतापर्यंत एनसीबीने कोणालाही चौकशीसाठी बोलावलं नसून करणला नोटीसमध्ये हजर राहण्यासही सांगितलेलं नाही. या व्हिडिओबद्दल करणने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं होतं. २०१९ च्या हाऊस पार्टीमध्ये ड्रग्स वापरले गेले नसल्याचं त्यानं यात स्पष्ट केलं होतं. करणने स्वतः स्पष्ट केलं की तो ड्रग्ज घेत नाही तसंच तो ड्रग्जला प्रोत्साहनही देत नाही. त्याच्या पार्टीत दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, रणबीर कपूर, वरुण धवन, विक्की कौशल यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज होते. अकाली दलाचे नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी असा दावा केला होता की एनसीबी लवकरच करण जोहरला बोलावणार आहे. मनजिंदरसिंग यांनी करणच्या पार्टीची एनसीबी प्रमुख राकेश अस्थाना यांच्याकडे तक्रार केली आणि पुरावा म्हणून व्हिडिओ सादर केला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2LOvI51