Full Width(True/False)

बोमन इराणी सुधीर जोशींच्या घरी सत्यणारायाच्या पूजेला बसतात तेव्हा...

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते हे त्यांच्या भूमिकेतून आजही प्रेक्षकांच्या आठवणींत आहेत. सुधीर जोशी मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध होतेच, परंतु इंग्रजी नाटकांमध्येही त्यांचं नाव लोकप्रिय होतं. त्यामुळं सुधीर जोशी आणि बॉलिवूड अभिनेते यांच्यातली मैत्री फार कमी लोकांना माहित होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलखातीत बोमण यांनी सुधीर जोशींबद्दलच्या आठवणी सांगितल्या. बोमन आणि सुधीर यांच्यात मैत्री पलीकडचं नातं होतं, असंही बोमण म्हणाले. ‘आय अॅम नॉट बाजीराव’ या नाटकाची आजही चर्चा केली जाते. सुधीर जोशी आणि बोमन इराणी या नाटकांत एकत्र काम केलं होतं. सौरव पंत याच्यासोबत गप्पा मारताना बोमन यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. वाचा: सुधीर जोशींकडून खूप का शिकता आलं. माझ्या डोक्यात काय विचार सुरू आहेत हे त्यांना माहिती असायचं आणि त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे मला समजायचं, असं बोमन म्हणाले. सत्यनारायणाच्या पुजेला बसलो... सुधीर जोशींना मुलं नव्हती. त्यामुळं त्यांनी त्यांच्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेला बोमन आणि त्यांच्या पत्नीला बसवलं होतं, असा एक किस्साही त्यांनी सांगितला. 'माझ्यावर नव्हे तर माझ्या पत्नीवरही सुधीर यांचं वडिलांप्रमाणे प्रेम होतं. त्यांच्या घरी एकदा सत्यनारायणाची पूजा होती. त्यांना मुलं नव्हती, त्यामुळं आम्ही त्यांच्याघरी सत्यनारायणाच्या पूजेला बसलो होतो. आम्ही त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनलो होतो', असं बोमन यांनी सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2LhTpT7