मुंबई: नव्या वर्षात टीव्हीवर दाखल होणाऱ्या मालिकांमध्ये ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेबद्दल उत्सुकता आहे. या मालिकेत होळकर यांचे जीवनकार्य उलगडणार आहे. अहिल्याबाईंनी तत्त्कालीन रूढींना आव्हान देत महिला सशक्तीकरणाचा मार्ग कसा खुला केला, हे त्यात दाखवलं जाणार आहे. ‘’ या मालिकेत महाराणी सोयराबाईसाहेबांची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री या मालिकेत अहिल्याबाई होळकरांची सासू यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ऐतिहासिक मालिकांमधून पाहणाऱ्याला प्रेरणा मिळेल, असं काही दाखवलं जातं, त्यामुळे अशा मालिका आवडत असल्याचं स्नेहलता सांगतात. मालिकेतल्या भूमिकेबद्दल स्नेहलता म्हणाल्या, ‘गौतमाबाई यांची भूमिका साकारण्याची उत्तम संधी मला मिळाली आहे. मी स्वतः एक आई असल्यामुळे मी त्यांचा दृष्टिकोन, खंडेरावांबद्दलचं त्यांचं प्रेम आणि त्याचं संरक्षण करण्याची एका आईची खटपट मी समजून घेऊ शकले. मालिकेतले सहकलाकारही अतिशय प्रतिभावान आहेत. त्यामुळे मला चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय. अहिल्याबाई या प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या सासूची भूमिका करणं, हे आव्हानात्मक आणि त्याचवेळी रोमांचकही आहे. मला ठरावीक कालखंड त्यातही ऐतिहासिक मालिका आवडतात. अशा मालिकांमधून प्रेक्षकांना काही बोध, विचार देणारी मांडणी होते.’
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rEbco2