मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्क शर्मा लवकरच आई होणार असून सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोशूटच्या चर्चा रंगल्या आहेत.येत्या जानेवारी महिन्यात अनुष्का बाळाला जन्म देणार असून तिनं होणाऱ्या बाळाबद्दल अनेक गोष्टींचा विचार करून ठेवला आहे. एका प्रसिद्ध मासिकासाठी अनुष्कानं ग्लॅमरस फोटोशूट केलं असून तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला आहे. सेलिब्रिटी किड्सचं क्रेझ पाहाता अनुष्का आणि विराट यांनी त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं अनुष्कानं सांगितलं.आम्ही बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं अनुष्कानं या मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. तर आम्हाला मस्ती करणारं बाळ नकोय, असंही ती म्हणाली. आमच्या घरात लहानमुलांचे लाड पुरवले जातातच, पण त्यांना मोठ्यांचा आदर करण्यासही शिकवलं जातं, असंही ती म्हणाली. ११ डिसेंबर २०१७ रोजी आणि यांनी राजेशाही थाटात लग्न केलं. इटलीत त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दोघं लग्नाआधी चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी सोशल मीडिया अकाउंटवर ते आई- बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34Xgotj