मुंबई: करोनाच्या विषाणूमुळे २०२० हे वर्ष सगळ्यांसाठी खूप वेगळं आणि कठीण होतं. पण, आता हे वर्ष संपून नवं वर्ष सुरु होणार आहे. नवं वर्ष अगदी धूमधडाक्यात साजरं होणार नसलं तरीही येणाऱ्या वर्षाकडून खूप अपेक्षा आहेत. आपल्या कलाकार मंडळींनी त्यांच्या न्यू इअर प्लॅन्समध्ये काही बदल केले आहेत. काहींनी घरी राहणं पसंत केलं आहे, तर काहींनी कुटुंबासोबत वेळ घालण्यास प्राधान्य दिलं आहे. माधुरी दीक्षितनं २०२०मधील आठवणी व्हिडिओच्या रुपात चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. अभिनेते अनिल कपूर यांनी देखील चाहत्यांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. करिना कपूर खान देखील सैफ आणि तैमूरसोबत घरीच नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hAc2gT