Full Width(True/False)

१ जानेवारी २०२१ पासून 'या' स्मार्टफोन्समध्ये WhatsApp चालणार नाही, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः २०२० या वर्षातील आजचा अखेरचा दिवस आहे. ३१ डिसेंबर रोजीच्या पूर्वसंध्येला जगभरातून या वर्षाला निरोप दिला जाईल. तसेच नवीन वर्ष २०२१ या नूतन वर्षाचे जोरदार स्वागत केले जाईल. नवीन वर्षात अनेक जणांना बदल अपेक्षित आहेत. २०२० हे वर्ष लोकांना फारसे चांगले गेले नाही. नवीन वर्षात काही बदल करणार आहे. काही जुन्या फोनमधील आपला सपोर्ट काढून घेणार आहे. यात त्या स्मार्टफोन्सचा सुद्धा समावेश आहे जे जुन्या अँड्रॉयड आणि iOS व्हर्जनवर काम करीत आहेत. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, २०२१ मध्ये व्हॉट्सअॅप आयफोन्स आणि अँड्रॉयड फोन्समध्ये काम करणार नाही जे जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करीत आहेत. वाचाः सध्या व्हॉट्सअॅप अँड्रॉयड ४.३ किंवा यापेक्षा जुन्या आणि iOS 9 किंवा यापेक्षा जुन्या व्हर्जनवर चालत असलेल्या स्मार्टफोन्सला सपोर्ट करीत आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप आता या अँड्रॉयड व आयओएस व्हर्जनसाठी सपोर्ट काढून घेणार आहे. याचाचा अर्थ अँड्रॉयड ४.३ किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या आणि iOS 9 किंवा त्यापेक्षा जुन्या ओएस साठी व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही. परंतु, व्हॉट्सअॅपने यासंबंधी अद्याप अशी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. वाचाः याआधी फेब्रुवारीमध्ये या वर्षी व्हॉट्सअॅपने अँड्रॉयड 2.3.7 आणि यापेक्षा जुन्या iOS 8 तसेच यापेक्षा जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या फोन्सचा सपोर्ट काढून घेतला होता. २०२१ च्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपकडून जुन्या अँड्रॉयड व आयओएस व्हर्जनचा सपोर्ट काढून घेतला जावू शकतो. अँड्रॉयड ४.३ खूप जुने झाले आहे. याला २०१२ मध्ये लाँच करण्यात आले होते. अॅपलने २०१५ मध्ये iOS 9 रिलीज केले होते. लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम मध्ये अँड्रॉयड ११ आणि iOS 14 हे सर्वात नवीन आहेत. त्यामुळे जुन्या व्हर्जनवर चालणारे युजर्स सुद्धा फार कमी आहेत. परंतु, याचा अनेकांना फटका बसू शकतो. कारण, व्हॉट्सअॅप जगभरात वापरले जाणारे प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. वाचाः व्हॉट्सअॅपने आता ही घोषणा अद्याप केली नाही की, कंपनी या अँड्रॉयड डिव्हाइसेज आणि आयफोन्ससाठी सपोर्ट बंद करणार आहे की नाही. परंतु, जर तुम्ही अँड्रॉयड ४.३ किंवा आयओएस ९ वर चालणाऱ्या फोनचा वापर करीत असाल तर आयफोन युजर्स Settings > General > About मध्ये जावून सॉफ्टवेयर व्हर्जन चेक करू शकता. तर अँड्रॉयड युजर्स सेटिंग्स मेन्यू मध्ये जावून About Phone सेक्शन चेक करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pDslwc