Full Width(True/False)

२०२१मध्ये मनोरंजनाचा धमाका; मोठे चित्रपट होणार प्रदर्शित

मुंबई टाइम्स टीम बॉलिवूडसाठी २०२० हे वर्षं एखाद्या ट्रॅजिडी चित्रपटासारखं होतं. लॉकडाऊननंतर इंडस्ट्री पुन्हा रुळावर येत आहे. यंदाची दिवाळी, दसरा, ईद, नाताळ बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिससाठी थंड होते. अनेक हिंदी सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित झाले. त्यामुळे चित्रपटांच्या थिएटर प्रदर्शनाचं गणित मात्र बिघडलं. पण, याचा आता फार विचार न करता हिंदी सिनेसृष्टीनं त्यांचं २०२१ चं कॅलेंडर आखायला घेतलं आहे. सिनेनिर्मात्यांचा डोळा हा या वर्षातल्या सणासुदीच्या दिवसांवर आहे. बॉलिवूडचं इंजिन कमाल वेगानं २०२१ मध्ये पुढे जाणार आहे. त्यामुळे हे आणि पुढील वर्ष प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या दृष्टीनं मेजवानी ठरणार असल्याचं बोललं जातंय. 'सरदार उद्दम सिंग', 'बच्चन पांडे', 'अतरंगी रे', 'बेल बॉटम', 'सत्यमेव जयते २', 'राधे', 'मैदान', 'रक्षा बंधन', '' सारखे बड्या कलाकारांच्या बहुचर्चित सिनेमांनी या वर्षातील आपापल्या तारखा राखून ठेवल्या आहेत. रणवीर सिंहचा बहुप्रतीक्षित '८३' हा चित्रपट या वर्षीच्या प्रारंभी प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. असं झाल्यास हिंदी सिनेसृष्टीला नववर्षात चालना मिळू शकते, असं निर्माते आणि ट्रेंड अॅनालिस्ट गिरीश जोहर सांगतात. सिनेमांची चंगळ अभिनेता अक्षय कुमारनं पुढच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात स्वतःचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट प्रदर्शनासाठी घोषित केला आहे. आमिर खाननं 'लाल सिंग चड्डा' या सिनेमाचं प्रदर्शन यावर्षी नाताळपर्यंत पुढे ढकललं आहे. त्याचप्रमाणे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 'व्हॅलेंटाइन डे'च्या आसपास शकुन बत्राचा आगामी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा 'अतरंगी रे' हा चित्रपट देखील याच दिवसांमध्ये प्रदर्शित करण्याचं निर्मात्यांनी योजलं आहे. 'केजीएफ २', 'तुफान', 'राधेश्याम', 'आरआरआर', 'रश्मी रॉकेट', 'अंतिम', 'लव्ह हॉस्टेल', 'जर्सी' सारख्या सिनेमांची चंगळ या वर्षी असेल. काय घडतंय बॉलिवूडमध्ये ? * अभिषेक कपूर दिग्दर्शित आणि आयुषमान खुराना-वाणी कपूर अभिनीत 'आशिकी' या सिनेमांचं चित्रीकरण सुरू. * शाहरुख खान 'पठाण' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र. * महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम'चं चित्रीकरण सुरु आहे. * विकी कौशलच्या ‘शुभ आरंभ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात. * तापसी पन्नू 'रश्मी रॉकेट'च्या चित्रीकरणाच व्यग्र. ईदला वर्णी कोणाची? सलमान खानचा 'राधे' आणि जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जायते २' हे चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतात. त्यामुळे आता ईदला कोणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दिवाळीतही अक्षयच या वर्षी दिवाळीच्या दिवसात अक्षय त्याचा 'रक्षा बंधन' हा सिनेमा घेऊन येणार आहे. त्याबाबत त्यानं स्वतः चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करत यापूर्वी माहिती दिली आहे. ५ नोव्हेंबर २०२१ ला प्रदर्शित होणारा हा सिनेमा आनंद एल. राय दिग्दर्शित करणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3b6jvTA