Full Width(True/False)

ओटीटी २०२१ही गाजवणार;'या'सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई टाइम्स टीम ओटीटीचं () नाणं २०२० मध्ये खणखणीत वाजलं. लॉकडाउनमध्ये मनोरंजनाची इतर माध्यमं ब्रेकवर असताना ओटीटीने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आशय दिला. प्रेक्षकांना मनोरंजनासाठी ओटीटीचा आधार होता. तसंच वेबविश्वाने पुढच्या दोन-तीन वर्षांत जेवढी प्रगती केली असती ती त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केली. २०२० मध्ये ७० ते ८० सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आल्या. लॉकडाउन नसतं तर या वर्षात एवढ्या सीरिज प्रदर्शित झाल्या नसत्या असं जाणकार सांगतात. पण, डिजिटल प्लॅटफॉर्म्सनी लॉकडाउनचा फायदा घेत एका मागोमाग दर्जेदार आशय आणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण, आता पुढे काय? असा प्रश्न आहेच. आता २०२१ मध्ये ओटीटी ब्रेकवर जाणार किंवा आशयनिर्मितीचा वेग कमी होणार? असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. कारण नव्या वर्षातही ओटीटीची घोडदौड कायम राहणार आहे. आताच्या घडीला साधारण १० ते १५ सीरिजचं चित्रीकरण वेगानं सुरु आहे. २०२१च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये २५-३० सीरिज प्रदर्शित करण्याचा चंग ओटीटी प्लेअर्सनी बांधला आहे. २०२० मध्ये या माध्यमात झालेली गुंतवणूक बघता याही वर्षी बिग बजेट सीरिज येण्याची शक्यता आहे. भव्यदिव्य लोकेशन्स बुक केली जात आहेत. मोठ्या कलाकारांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. बॉलिवडूमधल्या मोठ्या कलाकारांनी ओटीटीकडे मोर्चा वळवला आहे. मल्टीस्टारर सीरजकडे कल वाढू लागलाय. त्यामुळे ओटीटी २०२१ गाजवण्यासाठी सज्ज झालं आहे. दुसऱ्या सीझनच्या तयारीतमागच्या वर्षी लोकप्रियता मिळवलेल्या सीरिजचे दुसरे सीझन या वर्षी आणले जातील. तसंच प्रेक्षकांना आवडलेला आशय यंदाही आणण्याचा सीरिजकर्त्यांचा मानस आहे. ' स्टोरी' या सीरिजला तुफान प्रतिसाद मिळाला. या सीरिजचे दिग्दर्शक हंसल मेहता या वर्षी तेलगी घोटाळ्यावर आधारित सीरिज आणणार आहेत, असं समजतंय. 'ब्रोकन बट ब्युटीफुल', 'अपहरण', 'आऊट ऑफ लव्ह' यासारख्या अनेक सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा झालेली आहे. ओटीटीवरही टक्करचित्रपटांप्रमाणे ओटीटीवरही सीरिजची टक्कर पाहायला मिळेल. एखाद्या खास दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्याप्रमाणे या वर्षात अनेक सीरिज एकाच दिवशी प्रदर्शित होतील. याची झलक मागच्या वर्षी पाहायला मिळाली. ही टक्कर यंदा अधिक प्रमाणात दिसून येईल. कोण गाजवणार?यंदा ओटीटी प्लॅटफॉर्म्स अनेक कलाकारांनी गाजवले. यात , , , अक्षय ओबेरॉय, आहाना कुमरा यासारख्या अनेक कलाकारांचा समावेश होता. आता २०२१ मध्ये कोणकोणत्या कलाकाराचा बोलबाला असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मराठी आशय येणारआतापर्यंत डिजिटलविश्वात हिंदी आशय मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. पण, मराठी आशय तुलनेनं कमी बघायला मिळालाय पण आता २०२१ मध्ये ओटीटीवर मराठी आशय बघायला मिळेल, असं जाणकार सांगतात. एमएक्स प्लेअरवर आलेल्या मराठी वेब सीरिजना चांगला प्रतिसाद मिळाला होता. शिवाय, अक्षय बर्दापूरकरचा 'प्लॅनेट मराठी' हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XdESup