मुंबई: आणि नताशाच्या लग्नानंतर अभिनेत्री देखील लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर श्रद्धानं बोलणं टाळलं असलं तरी वरुण धवनच्या एका रिप्लायमुळं श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चेला हवा मिळत आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर वरुणला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यात श्रद्धा कपूर हिचा कथीत बायफ्रेंड यानंही नताशा आणि वरुणला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. रोहनच्या या मेसेजला रिप्लाय करताना वरुणनं 'आता तू देखील यासाठी तयार असशील' असं म्हटलं. त्यामुळं नेटकऱ्यांनी याचा संबंध थेट श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाशी जोडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धा आणि रोहन यांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. पण, दोघांनी अद्यापही यावर न बोलणं पसंत केलं आहे. असं असलं तरी श्रद्धाचे वडिल यांनी रोहन आणि श्रद्धा यांच्यातील नात्याबद्दल काही खुलासा केला आहे. 'रोहन चांगला मुलगा आहे. आमच्या घरी त्याचं लहाणपणापासूनंच येणं-जाणं आहे. श्रद्धा आणि रोहन त्यांच्यात चांगली मैत्री आहे. असं असलं तरी श्रद्धानं मला सांगितलं नाही की, तिला रोहनसोबत लग्न करायतं आहे. त्यामुळं ते दोघं एकमेकांबद्दल किती सिरियस आहेत , याची मला कल्पना नाहीए', असं शक्ती कपूर यांनी म्हटलं आहे. तसंच रोहनंच का? त्याच्या जागी कोणताही मुलगा असला तरी माझा तिला पूर्ण पाठिंबा असणार आहे, असं शक्ती कपूर यांनी स्पष्ट केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39lV3wq