मुंबई- ‘’ या सिनेमात अशा एका माणसाचा प्रवास दाखवण्यात आला आहे ज्यात त्याच्या मृत्यूचं खोटं नाटक रचलं जातं. त्याची मालमत्ता हडपण्यासाठी नातेवाईकांकडून तो मरण पावल्याची खोटी कागदपत्रं तयार करण्यात येतात. संपूर्ण सिनेमात पंकज ऊर्फ लालसिंग सरकार आणि अधिकाऱ्यांना तो जिवंत असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सिनेमाच्या शूटिंगबद्दल आणि सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना म्हणाले की, 'हा एक चांगला अनुभव होता. आम्ही सीतापूर, बिस्वा कंदूनी जवळ शूट करत होतो. आम्ही दररोज ६० ते ७० किलोमीटर प्रवास करायचो.' ते पुढे म्हणाले की, 'सेटवर जातानाचा दररोजचा हा ६० ते ७० किमीचा प्रवास करताना मला स्वतःला फार चांगलं वाटायचं. मी माझ्या गावीच जात असल्याचा अनुभव मला नेहमी व्हायचा. या प्रवासात मी काही ताज्या भाज्या विकत घ्यायचो आणि स्वत: स्वयंपाक करायचो. एवढंच नाही तर शेतात ट्रॅक्टर पाहिल्यानंतर माझ्या भूतकाळातल्या अनेक आठवणी ताज्या झाल्या.' 'कागज' हा पंकज त्रिपाठी यांचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला सिनेमा आहे. सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली असून सतीश कौशिक यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी या सिनेमात वकिलाचीही भूमिका वठवली आहे. येत्या ७ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'कागज' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oeAWW2