Full Width(True/False)

राम गोपाल वर्मा यांनी तडकाफडकी सोडली कायमची मुंबई, ऑफिसही केलं बंद

मुंबई- अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शक करणारे यांनी आता शहरात न राहण्याचा निर्णय घेतला आहे. राम वर्मा यांनी कायमचं हे शहर सोडल्याचं वृत्त आहे. असं असलं तरी राम गोपाल वर्मा यांचं कार्यालय अजूनही मुंबईच्या उपनगरी भागात आहे. असं म्हटलं जात आहे की राम यांनी मुंबई सोडून गोव्यात कायमचं राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण कामानिमित्त ते मुंबईत ये- जा करत राहतील. 'ईटाइम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत राम गोपाल वर्मा म्हणाले की,' मी सध्या ज्या प्रोजेक्टवर काम करत आहे त्याकरिता गोवा हे योग्य ठिकाण आहे. माझं ऑफिस 'फॅक्टरी' हेही आता मुंबईत नाही. लॉकडाउनच्या काळात मी हैदराबादमध्ये बराच काळ घालवला. त्याहीआधीपासून मी मुंबईत फार काळ रहायला नव्हतो.' राम गोपाल वर्मा म्हणाले की, 'करोना विषाणू आणि लॉकडाउनमुळे सर्व समीकरणं बदलली आहेत. प्रत्येकजण आता संपर्कासाठी नवीन माध्यमांचा वापर करत आहेत. आता समोरा- समोर मीटिंग करणं ही ऐतिहासिक गोष्ट झाली आहे. आता प्रत्येकजण ऑनलाइन मीटिंग किंवा चॅटचा पर्याय निवडताना दिसतात.' राम गोपाल वर्माचा हॉरर फिल्म '१२ ओ क्लॉक' लवकरच प्रदर्शित होणार आहे. मिथुन चक्रवर्ती या सिनेमात मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका साकारत आहेत. मिथुन यांच्या व्यतिरिक्त फ्लोरा सॅनी आणि मानव कौल यांचीही चित्रपटात महत्वाची भूमिका असणार आहे. याशिवाय राम गोपाल वर्मा लवकरच त्यांचे काही नवीन वेब शो घेऊन येणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pNLoEh