मुंबई- '' या कार्यक्रमात गैरव्यवहार केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळातील अभिनेत्री , आणि अभिनेते यांच्यासह ११ जणांना त्यांना देण्यात आलेले १० लाख ७८ हजार रुपये १५ दिवसांमध्ये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टायपिगंमध्ये झालेल्या चुकीचा या मंडळींनी गैरफायदा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यात माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, दिग्दर्शक विजय कोंडके, मिलिंज अष्टेकर, सुभाष भुरके, सतीश बिडकर यांच्यासह विजय पाटकर, अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यावर हे आदेश लागू करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर तत्कालीन संचालक मंडळाने १० लाख ७८ हजार रुपये रक्कम १५ दिवसांमध्ये भरली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं धर्मादाय सहआयुक्त श.ल. हर्लेकर यांनी दिले आहेत. ५ ते १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१० ते २०१५ मध्ये मानाचा मुजरा हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. काही कालावधीनंतर यात घोटाळा करण्यात आल्याचा आरोप स्पष्ट झाला होता. टायपिंगमध्ये झालेल्या चुकीचा फायदा या मंडळींनी उचलला होता. 'खात्यामध्ये भरा' ऐवजी 'खात्यामधून भरा' असा शब्द टाइप करण्यात आला होता. नेमकी संचालकांकडून या शब्दाचा अर्थ वेगळा काढण्यात आला. भास्कर जाधव, प्रमोद शिंदे आणि रणजीत जाधव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे यासंबंधी तक्रार केली होती. यानंतर कार्यालयाने वाक्यात दुरुस्ती करत संचालकांना पैसे भरण्याचे आदेश दिले. दिलेल्याआदेशाविरोधात मागील कार्यकारणीचे तत्कालीन उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MbE32Y