Full Width(True/False)

६ कॅमेऱ्याचा मोटोरोलाचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः Motorola ने सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Motorola Moto G 5G नंतर आपला फ्लॅगशिप मोबाइल सुद्धा लाँच केला आहे. कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. ६ कॅमेरा, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० एसओसी प्रोसेसर, ६.७ इंचाचा एलसीडी स्क्रीन आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत मोटोरोलाचा फ्लॅगशीप स्मार्टफोन Motorola Edge S ला चीनमध्ये १९९९ चिनी युआन म्हणजेच केवळ २२ हजार ५४५ रुपयांत लाँच केले आहे. वाचाः फोनची किंमत Motorola Edge S ला ३ व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आले आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत १९९९ युआन म्हणजेच २२ हजार ५४५ रुपयात लाँच करण्यात आले आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजला २३९९ युआन म्हणजेच २७ हजार ०५७ रुपयांत लाँच करण्यात आले आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजला २७९९ युआन म्हणजेच ३१ हजार ५५७ रुपयांत लाँच करण्यात आले आहे. वाचाः फोनची वैशिष्ट्ये मोटोरोलाच्या या फोनमध्ये ६.७ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन साइज 1080x2520 पिक्सल आहे. तसेच याचा रिफ्रेश डिस्प्ले रेट ९० हर्ट्ज आहे. अँड्रॉयड ११ वर बेस्ड या फोनमध्ये Qualcomm SM8250-AC 5G प्रोसेसर दिला आहे. मोटोरोलच्या या फोनला क्वॉड रियर कॅमेरा सोबत लाँच करण्यात आले आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. सेकंडरी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स दिला आहे. तसेच २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर सोबत TOF 3D कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनची फीचर्स या फोनमध्ये ड्यूल फ्रंट कॅमेरा आहे. ज्यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. सेकंडरी सेन्सर ८ मेगापिक्सलचा दिला आहे. १०० डिग्री अल्ट्रावाइड फीचर सोबत येतो. मोटोरोलाच्या या जबरदस्त फोनमध्ये 5000 mAh बॅटरी दिली आहे. २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. या फोनला लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे. सध्या मोटोरोलाच्या Moto G 5G ची भारतात जबरदस्त विक्री होत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M73DX4