Full Width(True/False)

..म्हणून राज कुंद्राने मुलाला दाखवली रस्त्यावर झोपलेली माणसं

मुंबई- हिचा नवरा हा सिनेसृष्टीचा भाग नसला तरी तो चाहत्यांमध्ये बराच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तो सतत लोकांचं मनोरंजन करत असतो. तो बर्‍याचदा मजेशीर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. असं असलं तरी नुकताच त्याने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याचीच सध्या चर्चा होताना दिसत आहे. त्याची ही पोस्ट प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. राज याने आपल्या मुलाला घेऊन रस्त्यावरील गरिब लोकांना ब्लँकेट वाटत केलं. राज म्हणाला- मुलांना संस्कार देणे आवश्यक राज कुंद्राने व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले की, 'एक दिवस एक चांगलं काम. आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे. आपण गोष्टी हलक्या पद्धतीने घेऊ शकत नाही.' राज कुंद्रा म्हणाला की तो सकाळी ६ वाजता मुलासह गरिबांना ब्लँकेट वाटपासाठी घराबाहेर पडत आहेत. मुलांना हे शिकवणं आवश्यक आहे की डोक्यावर छत, ताटात जेवण आणि झोपायला चांगली गादी सहज उपलब्ध होत नसते. राज कुंद्रा शेअर करत असतो मजेदार व्हिडिओ राज कुंद्रा आपल्या कुटुंबियांचे मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याचे फेसबुक व्हिडिओ खूप लोकप्रिय आहेत. मुलगी समिशासोबतचे अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. अलीकडेच त्याने शिल्पा शेट्टीचा पंजाबी कुडी लूक आणि मुलीच्या नवीन खेळण्यांचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या या दोन्ही व्हिडिओंना लाखो लोकांनी पाहिलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iRSup5