Full Width(True/False)

कार्तिकी गायकवाडला वडिलांकडून लग्नात मिळाली 'ही' महागडी कार गिफ्ट

मुंबई: सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती व लाईव्ह शो करणारी हिनं आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केलीआहे. कार्तिकी गेल्या महिन्यातच विवाहबंधनात अडकली आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातही कार्तिकीनं पती याच्यासोबत नुकतीच हजेरी लावली होती. सध्या सोशल मीडियावर कार्तिकीला तिच्या वडिलांकडून मिळालेल्या एका महागड्या गिफ्टची चर्चा सुरू आहे. कार्तिकीच्या वडिलांनी कार्तिकीला एक महागडी लक्झरी कार भेट म्हणून दिली आहे. यांनी लाडक्या लेकीला मर्सिडीज ई क्लास ही कार भेट म्हणून दिली आहे. जुन महिन्यात कार्तिकीच्या घरी कांदेपोह्याचा म्हणजेच पाहण्याचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्राच्या मुलासोबत कार्तिकींच लग्न झालं. २६ जुलै रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला होता. रोनित पिसे असं कार्तिकीच्या पतीचं नाव आहे. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3r2CRh9