नवी दिल्लीः जगभरासह भारतात करोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला असला तरी करोनाची भीती मात्र कायम आहे. पॅनासोनिक इंडिया कंपनीने आज एक जबरदस्त टेक्नोलॉजी असलेला एसी () लाँच केला आहे. या एसीमध्ये नॅनो एक्स टेक्नोलॉजी (nanoe X technology)दिली असून या टेक्नोलॉजीमुळे करोना विषाणू रोखण्यास मदत होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. वाचाः हे नवीन नॅनो एक्स तंत्रज्ञान पाण्यामध्ये असलेले हायड्रोक्सिल रॅडिकल्स उत्सर्जित करते. हायड्रोक्सिल रॅडिकल्स 'नेचर्स डिटर्जंट' म्हणून देखील ओळखले जातात, ज्यांच्यामध्ये ९९.९९ टक्के नोव्हेल कोरोनाविषाणूच्या (सार्स-कोव्ह-२) प्रतिबंधासह जीवाणू व विषाणूंचे प्रतिबंध करण्याची क्षमता आहे.फाइव्ह-स्टार इन्व्हर्टर नॅनो™एक्स एअर कंडिशनर्स १-टन व १.५-टन आकारमानामध्ये उपलब्ध असतील. (CS/CU-HU18XKYF) ची किंमत ६६,००० रूपये असेल. भारतीय ग्राहक लवकरच प्रमुख रिटेल आऊटलेट्स, ऑनलाइन पोर्टल्स आणि पॅनासोनिक ब्रॅण्ड स्टोअर्समध्ये पॅनासोनिक एअर कंडिशनर्सच्या नवीन रेंजचा अनुभव घेऊ शकतात. वाचाः नॅनो एक्स एअर कंडिशनर्सच्या नवीन रेंजमध्ये अधिक सुरक्षितता व आरामदायी सुविधेसाठी इको एनएव्हीआय, ट्विन कूल आयएनव्ही आणि जेटस्ट्रिम तंत्रज्ञान आहे. टेक्ससेलमधील प्रयोगशाळेमध्ये चाचणी करण्यात आलेल्या नवीन नॅनोएक्स एअर कंडिशनर्समध्ये नोव्हेल कोरोनाविषाणूवर (सार्स-कोव्ह-२) प्रतिबंधितात्मक परिणाम करण्याची क्षमता आहे. या एसींमध्ये नॅनो एक्स डिवाईस स्थापित करण्यात आले आहे, जे एका सेकंदामध्ये ४.८ ट्रिलियन हायड्रोक्सिल रॅडिकल्स उत्सर्जित करते आणि घरातील हवा शुद्ध करत दुर्गंधी दूर करते. हे नॅनोएक्स एअर कंडिशनर्स फॅन मोडमध्ये चालू शकतात आणि ऊर्जा कार्यक्षमता व दिवसभर घरातील सुरक्षिततेच्या खात्रीसाठी प्रत्येकवेळी कम्प्रेसर/ एअर कूलिंग वैशिष्ट्याची गरज भासत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. वाचाः वााचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r0f0is