Full Width(True/False)

बॉलिवूड स्टार ज्यांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा केला इन्शुरन्स

मुंबई- बॉलिवूड कलाकार जेवढे त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध असतात तेवढेच ते त्यांच्या लाइफस्टाइल आणि खासगी आयुष्यासाठीही असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक आश्चर्यकारक आणि विचित्र गोष्टी अनेकदा ऐकायला मिळत असतात. जीवन विमा करणं ही तर आपल्यासाऱ्यांसाठी सर्वसामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की काही बॉलीवूड स्टार्सनी त्यांच्या शरीरातील ठराविक अवयवांचाही विमा केला आहे. मालमत्ता, दागदागिने आणि इतर महागड्या वस्तूंसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या अनेक अवयवांचा विमा काढला आहे. नेमकी हे सेलिब्रिटी कोण ते आज आपण जाणून घेऊ.. महानायक बिग बी यांच्या अभिनयाचे तर कोट्यवधी चाहते आहेत. त्यांचा आवाज, त्यांचं व्यक्तिमत्त्व सगळ्याचीच चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. आजची तरूण पिढीही त्यांच्यासारखा भारदस्त आवाज आपलाही असावा अशी इच्छा व्यक्त करताना दिसते. स्वतः अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आवाजाचं महत्त्व माहीत आहे. याचमुळे त्यांनी आपल्या आवाजाचा विमा करून घेतला आहे. मल्लिका शेरावत बॉलिवूडची 'मर्डर' गर्ल मल्लिका शेरावतच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. मल्लिकाचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. अशात मल्लिकाने कोणत्याही एका अवयवाचा नाही तर संपूर्ण शरिराचाच विमा उतरवला आहे. यासाठी तिने तब्बल ५० कोटी मोजले. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जॉन अब्राहम याने स्वतःच्या हिचा विमा केला होता. 'दोस्ताना' सिनेमाच्या प्रदर्शनानंतर त्याने हिपचा विमा करून घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्याने हिपच्या विम्यासाठी जवळपास १० कोटी रुपयेही खर्च केले. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा दबदबा कायम राखत आहे. जगभरात तिच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. तिच्या मोहक हासूचे लाखो दिवाने आहेत. याच गोष्टीची प्रियांकालाही जाणीव आहे. याचमुळे तिने चक्क आपल्या हास्याचा विमा काढून ठेवला आहे. लता मंगेशकर गानकोकिला लता मंगेशकर यांच्या आवाजाबद्दल कोणी काहीच बोलू शकत नाही. अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली असून अनेक दशक त्यांनी गायन क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. स्वतः लता दीदींनी त्यांच्या गळ्याचा आणि आवाजाचा विमा काढला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hIU5Ns