नवी दिल्लीः डिसेंबर २०१९ मध्ये रियलमी ने Realme Koi सीरीज येण्याचा दावा केला होता. या सीरीज आधी काही टीजर्सवरून ही माहिती उघड झाली होती की, Realme Koi सीरीजचा अपकमिंग फोन कंपनीचा पहिला फ्लॅगशीप फोन असू शकतो. ज्यात स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर असणार आहे. त्यामुळे रियलमी कोई सीरीजचा पहिला फोन असणार आहे. आता रियलमी चायनाचे प्रसिडेंट शू की यांनी विबोवर यासंबंधीचा खुलासा केला आहे की, रियलमी व्ही १५ स्मार्टफोन ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता लाँच करण्यात येणार आहे. वाचाः शू की यांनी रियलमी व्ही १५ चे जे पोस्टर शेयर केले आहे. त्यावरून हे स्पष्ट होत आहे की, फोनमध्ये रियरवर एक जबरदस्त डिझाइन दिली आहे. जी जपानमध्ये मिळणारी Koi ओरनामेंटल फिश वरून इंस्पायर्ड आहे. फोनच्या रियरवर रेक्टांगल शेपच्या कॅमेरा सेटअप मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एलईडी फ्लॅश सोबत दोन लेन्स दिला आहे. वाचाः चीनमध्ये मल्टीपल रिटेलर्सकडे प्री बुकिंगसाठी उपलब्ध आहे. एका लिस्टिंगवरून फोनची फ्रंट डिझाइन उघड झाली आहे. फोनच्या पुढच्या बाजुला एक पंच होल डिस्प्ले पाहिला जावू शकतो. शू की यांनी रियलमी Realme V15 च्या फीचर्स संबंधी कोणतीही माहिती शेयर केली नाही. फोनची डिझाइन गेल्या महिन्याभरात लीक झालेल्या फोटोच्या रियरशी मिळतीजुळती आहे. Realme V15 या फोनमध्ये 800U चिपसेट दिला आहे. हँडसेटला ५० वॉट रॅपिड चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत लाँच केले जावू शकते. वाचाः याशिवाय, आणखी एका दुसऱ्या रिपोर्टमधून खुलासा करण्यात आला आहे की, नवीन रियलमी फोन्सला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर पाहिले गेले आहे. याचे मॉडल नंबर क्रमशः RMX3092 आणि RMX3093 आहे. लिस्टिंगवरून हेही उघड होत आहे की, या दोन्ही मॉडल्समध्ये डायमेंसिटी ७२० चिपसेट, ८ जीबी रॅम व अँड्रॉयड ११ ओएस दिला जाणार आहे. RMX3092 आणि RMX3093 मॉडल नंबर एकाच फोनचे आहेत, असेही समोर येत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ng6ZDA