Full Width(True/False)

कार्तिकच नशिब उजळलं, 'या' अभिनेत्रीसोबत मिळणार काम करण्याची संधी

मुंबई : बॉलिवूडमधील टॉप तरुण कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनचं नावही आता घेतलं जातं. तरुण वर्गामध्ये तर कार्तिकची प्रचंड क्रेझ आहे. मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत कार्तिकने सिनेरसिकांची मन जिंकली. आताही नव्या वर्षात तो नवनवीन भूमिका मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे. मध्यंतरी तर एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री कतरिना कैफबरोबर काम करण्याची इच्छा कार्तिक बोलून दाखवली होती. त्याची हिच इच्छा आता पुर्ण होणार आहे. खरंतर कार्तिकचं नशिबच उजळलं असं म्हणावं लागेल. ‘फ्रेडी’ या चित्रपटात कार्तिक मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबरीने आता अभिनेत्री कतरिना कैफचंही नाव या चित्रपटाशी जोडलं जात आहे. कार्तिक-कतरिना या चित्रपटात एकत्र काम करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र अद्यापही याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शाहरुख खान प्रॉडक्शनचा हा चित्रपट आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतरिनाला ‘फ्रेडी’ची कथा फारच आवडली आहे. शिवाय या चित्रपटातील तिची भूमिका ही अगदी हटके असणार आहे. तिने या चित्रपटाला ग्रीन सिग्नल दिला आहे. करिना-कार्तिकला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्यातरी कतरिनाकडे ‘फोन भूत’ हा चित्रपट आहे. शिवाय दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या आगामी चित्रपटातही ती काम करणार आहे. तसेच ‘टायगर 3’ चित्रपटासाठी पुन्हा सलमानबरोबर कतरिनाची निवड करण्यात आली आहे. नव्या वर्षात कतरिनाने बरेच हिंदी चित्रपट साईन केले आहेत. कार्तिकसाठीही येणारं वर्ष आनंदाचं ठरणार आहे. ‘भुल भुल्लैय्या 2’, ‘दोस्ताना 2’, ‘धमाका’ असे तीन चित्रपट सध्या कार्तिककडे आहेत. ‘फ्रेडी’ चित्रपटावरही सध्या तो काम करत आहे. कार्तिकने उत्तमोत्तम भूमिका साकारत अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्याच्या या नव्या चित्रपटांची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3csVmHQ