Full Width(True/False)

समिधा गुरू म्हणतेय माझ्या भूमिकेचा प्रेक्षकांना प्रचंड राग येतो; पण...

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री सध्या खलनायिकेची भूमिका चोख बजावतेय. '' या मालिकेतील ऐश्वर्या या भूमिकेसाठी तिला सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया येताहेत. ती साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांना राग येत असला तरी तीच तिच्या कामाची पोचपावती असल्याचं समिधा सांगते. संपदा जोशी ० मालिकाविश्वात पुनरागमन करण्यासाठी इतकी वर्षं का लागली ?- साधारण चार वर्षांनी मी मराठी मालिका करतेय. 'कमला' या मालिकेनंतर 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेत काम करतेय. मधल्या काळात हिंदी मालिकांचं काम सुरू होतं. काही चित्रपटांचं चित्रीकरण करत होते. नाटकाचे प्रयोगही सुरू होते. मराठी मालिकेत काम करण्याचा विचार होताच; पण चांगल्या कामाची वाट बघत होते. आता 'शुभमंगल...'मध्ये काम करताना पुन्हा कुटुंबात परतल्याची भावना आहे. ० खलनायिकेच्या भूमिकेचा अनुभव कसा आहे ?- मला खलनायिका साकारायला खूप आवडतं. याआधीही मी दोन मालिकांमध्ये खलनायिका साकारली आहे. खलनायिकेचं पात्र तुमच्यासारखं नसतं. त्यामुळे तिची विचार करण्याची पद्धत, वृत्ती, ती कोणत्या परिस्थितीत कशी वागेल या सगळ्याचा विचार करून मग भूमिका साकारावी लागते. तिचं म्हणणं बरोबर असतं; पण ते मांडण्याची तिची पद्धत चुकीची असते. माझ्या भूमिकेचा प्रेक्षकांना प्रचंड राग येतो. पण हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. ० इतर माध्यमांत पुनरागमन कधी ? - दिग्दर्शक अभिनय देव यांच्या एका हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. पण लॉकडाउन आणि करोनामुळे अजून पुढे काही झालं नाही. '' या नाटकाचे प्रयोग लवकरच सुरू होतील. लॉकडाउनच्या आधी चित्रित केलेला एक मराठी चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे नाटक, चित्रपटात सक्रिय आहेच. आता संधी मिळाली तर वेब सीरिजमध्येही काम करण्याची इच्छा आहे. ० 'क्राइम पट्रोल' मालिकेत पोलिसाची भूमिका साकारताना काय मेहनत घ्यावी लागते ?- कौटुंबिक मालिका आणि गुन्हेगारीविश्वावरील मालिका यात फरक असतो. करोना, लॉकडाउनच्या आधी आम्ही विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन चित्रीकरण करायचो. काही प्रसंगांसाठी तर त्या-त्या ठिकाणी जाऊन नाकाबंदीही केली आहे. या भूमिकेसाठी आवश्यक अशी पोलिसांची भाषाही मी शिकले. ० तू उत्तम नृत्यांगना आहेस. नृत्य आणि अभिनय यातला समतोल कसा साधतेस ?- मी माझ्या आईकडून कथक आणि ताईकडून राजस्थानी लोकनृत्य शिकले आहे. त्यानंतर नृत्य काहीसं मागे राहीलं. पण लॉकडाउनमध्ये माझ्या काही मैत्रीणींमुळे ते पुन्हा सुरू झालं. आम्ही ऑनलाइन नृत्याचे क्लास घेतले. व्हिडीओ शुट करून शेअरही केले. त्यामुळे नृत्य माझ्यापासून दूर गेलं नाही याची जाणीव झाली. माझी मुलगीही कथक शिकते. त्यामुळे आता तिच्याबरोबर नृत्याचा रियाज सुरू असतो. ० तू आणि तुझा नवरा दोघंही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असताना मुलीला वेळ कसा देता?- लॉकडाउनमध्ये तिला खूप वेळ देता आला. मिळालेला वेळ आम्ही सत्कारणी लावला. खूप नवनवीन गोष्टी शिकलो. इतर वेळेस तिच्याबरोबर कमी वेळ मिळतो पण चित्रीकरण संपून घरी आल्यावर 'मी टाइम' नावाचं एक सेशन असतं. त्यात ती माझ्याशी आणि तिच्या बाबाशी गप्पा मारते. दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करतो. सध्या तिच्या बाबाचं घरून काम सुरू असल्यानं तो तिला बऱ्यापैकी वेळ देतोय. तिचे आई-बाबा कोणत्या क्षेत्रात काम करताहेत हे तिला ठाऊक असल्यामुळे तिची वेळेबाबतीत कधीच तक्रार नसते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XwYbPc