मुंबई- वरुण धवनच्या ‘ऑक्टोबर’ सिनेमात दिसलेली ब्रिटीश अभिनेत्री करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलं. बनिताने कोलकाता येथील शासकीय इस्पितळात उपचार घेण्यास नकार दिला. बनिता संधू कोलकातामध्ये 'कविता अँड टेरेसा' सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. सोमवारी तिने करोना चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बनिता २० डिसेंबर रोजी कोलकाता येथे आली होती आणि तिने त्याच विमानातून प्रवास केला होता ज्यात म्यूटेन्ट करोना व्हायरसने बाधित तरुणाने प्रवास केला होता. याच प्रवासात तिला करोनाची लागण झाल्याचा संशय आहे. असं सांगितलं जात आहे की शासकिय इस्पितळात मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचं सांगत बनिताने शासकीय इस्पितळात उपचार घेण्यास नकार दिला. ती रुग्णवाहिकेतून बाहेर येण्यासही तयार नव्हती. अखेर रुग्णालय प्रशासनाने राज्य सचिवालय आणि आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. याशिवाय ब्रिटीश उच्चायुक्तांनाही याबाबत माहिती देण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनालाही घटनास्थळी पोचवावे लागले. घटनास्थळी पोहोचताच बनिता संधू तिथून निघू नये म्हणून पोलिसांनी रुग्णवाहिकेला घेराव घातला. मिळालेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ डॉक्टरांनी बनिताशी चर्चा केली आणि त्यानंतर तिला खासगी इस्पितळात दाखल केले गेले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Xeuz9d