मुंबई: ''चा प्रभाव वाढल्यानंतरअसल्याने देशभरात स्वयंस्फूर्तीनं प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले जात होते. काही टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांच्या नंबरवर कॉलर ट्यूनच 'करोना'बाबत जनजागृती करणारी लावली आहे. त्यानंतर 'करोना'च्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने काळजी घ्यावी, बॉलिवूड अभिनेते यांच्या आवाजातील एक कॉलर ट्यून प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला ऐकू येत होती. सोशल मीडियावर करोना व्हायरसच्या कॉलर ट्यूनवरून अनेक जणांनी जोक, मिम्स बनवले आहेत. करोना व्हायरसमुळे लोक मरतील की माहिती नाही परंतु, या कॉलर ट्यूनमुळं अनेक जण मरतील, अशा शब्दात या कॉलर ट्यूनची खिल्ली उडवली जात आहे. करोना व्हायरसची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी अनेकांनी कोर्टात याचिकाही दाखल केल्या होत्या. अखेर ही कॉलर ट्यून आता बंद होणार आहे. 'ही' असणार नवीन कॉलर ट्यूनयेत्या शुक्रवारपासून म्हणजेच १५ जानेवारीपासून बंद होणार असली तरी त्या ऐवजी लसीकरणाची नवी ट्यून मोबाईल युजर्सला ऐकू येणार आहे. या नवीन कॉलर ट्यूनला अमिताभ यांचाच आवाज असणार की आणखी कोणाचा? हे अद्यापही समजू शकलं नाही. दरम्यान,दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉलर ट्यून काढण्याची मागणी केली होती. या कॉलर ट्यूनमुळं भीती पसरवली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तर राजस्थानचे काँग्रेसचे आमदार भरत सिंह यांनीही या कॉलर ट्यूनला आक्षेप घेतला होता. भरत सिंह यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून फोनमध्ये ऐकू येणारी करोना विषाणूबाबत जनजागृती करणारी कॉलर ट्यून बंद करण्याची विनंती केली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35FyZuq