मुंबई- शेतकरी आंदोलनावरून आणि यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून ट्विटरवर जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. आता पुन्हा एकदा कंगनाने दिलजीतवर निशाणा साधला आहे. तिच्या या ट्वीटला त्याने प्रत्युत्तरही दिलं आहे. त्याचं झालं असं की, दिलजीतने आपल्या हॉलिडेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावर कंगनाने त्याची खिल्ली उडवत त्याला 'स्थानिक क्रांतिकारक' म्हटलं. यानंतर पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. दिलजीतने आपल्या ट्विटर हँडलवरून सेवतःचे काही फोटो शेअर केले. हे फोटो नक्की कुठले आहेत हे त्याने सांगितलं नाही. त्याचं हे ट्वीट रिट्वीट करत कंगनाने लिहिलं की, 'वा भावा!! स्थानिक क्रांतिकारक देशात आग लावून शेतकऱ्यांना रस्त्यावर बसवून परदेशात थंडीचा आनंद घेत आहे. वा.. याला स्थानिक क्रांतीकारक म्हणतात...' पुढे पाहा कंगना आणि दिलजीतचे ट्वीट- कंगनाच्या ट्वीटला उत्तर देताना दिलजीतने पंजाबमधील एका वृद्ध शेतकरी महिलेचा व्हिडिओ पोस्ट केला. तसंच रोमन-पंजाबीमध्ये लिहिले की 'असा विचार करू नकोस की आम्ही विसरलो आहोत.'त्याच्या या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने लिहिले की, 'मित्रा, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी नक्की कोणी लढा दिला आणि कोणी विरोध केला हे तर वेळच सांगेल. शेकडो खोटे एक सत्य लपवू शकत नाही आणि जे तुमच्यावर खरं प्रेम करतात ते तमुचा कधीच द्वेष करु शकत नाही. तुला काय वाटतं, पंजाब तुझ्यामुळे माझा विरोध करेल? हाहा... इतकी मोठी स्वप्न पाहू नकोस.. ती पूर्ण झाली नाहीत तर तुझंच हृदय तुटेल.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XbgxVK