नवी दिल्लीः एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटच्या युजर्संचा डेटा लीक झाला आहे. या डेटात युजर्संचे नाव आणि ईमेल यासारखी खासगी माहितीचा समावेश आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, हॅकर्स या डेटाचा वापर सायबर अटॅक किंवा त्या युजर्सना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो. वाचाः Cyber News च्या एका रिपोर्टनुसार, MyFreeCams नावाची एक पॉर्न वेबसाइटचा डेटा लीक झाला आहे. लीक डेटात जवळपास २० लाख युजर्संच्या माहितीचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, लीक झालेल्या डेटात युजर्सचा ईमेला आयडी, अॅड्रेस, युजरनेम आणि पासवर्ड यासारख्या गोष्टी लीक झाल्या आहेत. तसेच ही माहिती ब्लॅक मार्केटमध्ये विकली जात आहे. वाचाः डेटाच्या बदल्यात बिटकॉइन रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे की, युजर डेटाबेसला एका हॅकर्सच्या प्रसिद्ध फोरमवर विकले जात आहे. तसेच डेटाच्या बदल्यात बिटकॉइनची डिमांड केली जात आहे. १० हजार युजर्सच्या डेटाच्या बदल्यात १५०० डॉलर बिटकाइन म्हणून घेतले जात आहे. दावा करण्यात येत आहे की, १० हजार युजर्सचा डेटाला खरेदी करून कमीत कमी १० हजार डॉलर कमाई केली जाऊ शकते. वाचाः डेटा लीकच्या नंतर पॉर्न वेबसाइटने स्वतः याला दुजोरा दिला आहे. तसचे त्यांनी युजर्संना सूचना केल्यानंतर पासवर्ड रिसेट करण्यात आला आहे. चोरी करण्यात आलेला डेटाचे एक नमुना पाहिल्यानंतर उघड झाले आहे की, यात युजरनेम, ईमेल, अॅड्रेस, MyFreeCams टोकन बॅलन्स आणि पासवर्ड इन्फर्मेशन प्लेन टेक्स्ट म्हणून लिहिले आहे. MyFreeCams एक पॉप्युलर पॉर्न वेबसाइट असून याचे जवळपास ७० लाख (७ कोटी) मंथली विजिटर आहेत. प्रसिद्ध एडल्ट साइटमध्ये ही साइट २७ व्या स्थानावर आहे. MyFreeCams यूजरचे अनेक जण आता पासवर्ड बदलत आहेत. वाचाः हॅकर्स चोरी करण्यात आलेल्या माहितीचा अनेक पद्धतीने वापर करू शकतात. हॅकर्स यूजर्सचे MyFreeCams टोकन बॅलन्स संपवू शकतात. तसेच युजर्संना ब्लॅकमेल करण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LYtYq4