Full Width(True/False)

बस ड्रायव्हरचा मुलगा, झाला सिनेसृष्टीतला सर्वात महागडा अभिनेता

मुंबई- सुपरस्टार अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून वर आला आहे. त्याचा जन्म कर्नाटकातील हसन जिल्ह्यात झाला. यश कर्नाटक राज्य रोडवेज परिवहन महामंडळाच्या बस चालकाचा मुलगा आहे असं सांगितल्यावर पटकन कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या यशने सिनेमांमध्ये यश मिळवण्यापूर्वी बराच काळ संघर्ष केला आहे. यश या नावाने जरी तो जगभरात प्रसिद्ध असला तरी हे त्याचं खरं नाव नाही. यशचं मूळ नाव नवीन कुमार गौडा असं आहे. यशने आपलं शिक्षण म्हैसूर येथून पूर्ण केलं. त्यानंतर सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी तो बंगळुरूला शिफ्ट झाला. बंगळुरूमध्ये आल्यानंतर यशने प्रसिद्ध नाटककार बिवी कर्नाथ यांच्याबरोबर थिएटर करण्यास सुरुवात केली. यानंतर यशने टीव्हीमध्येही काही काळ काम केलं. त्याने नंदा गोकुळासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकेमध्ये काम केलं. यानंतर त्याने सिनेमांमध्ये आपलं नशीब आजमवून पाहण्याचं ठरवलं. २००७ मध्ये त्याला पहिला ब्रेक जम्बाडा हुडुगी या कन्नड सिनेमातून मिळाला. या सिनेमात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. यशने प्रसिद्ध अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केलं आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत. यश आणि राधिकाची पहिली ओळख टीव्ही सीरियल नंदा गोकुलाच्या सेटवर झाली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी राजेशाही थाटात लग्न केलं. यश आणि राधिका यांनी गरीब लोकांना मदत करण्यासाठी योशो मार्ग नावाची स्वयंसेवी संस्थादेखील उभारली आहे. यशने गेल्या १० वर्षात करिअरमध्ये बरेच चढ-उतार पाहिले. सध्या यश कन्नड सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. केजीएफच्या यशानंतर यश त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी सर्वसामान्यपणे १५ कोटी रुपये मानधन आकारत असल्याचं म्हटलं जातं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2LgZOOt